उमर्दे गावात महिलांनी पुढाकार घेत नष्ट केला दारूसाठा
By admin | Published: June 19, 2017 12:50 PM2017-06-19T12:50:26+5:302017-06-19T12:50:26+5:30
उमर्दे खुर्द गावच्या महिलांची निर्भिडता : आधी बंदी आणि मग ठराव करण्याचा पवित्रा
Next
भूषण रामराजे /ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.19 - गावात 18 वर्षे पूर्ण न करणा:या कोवळ्या मुलांना दारूचे व्यसन लागल्यावर कसे हो गप्प बसायचे, जग वेगाने बदलत आह़े यात हे व्यसनाधिन तग धरणार का, आताच्या अन् येत्या पिढीला संस्कारक्षम बनवण्यासाठीच मद्य विक्री करणा:यांना विरोध करून दारूबंदीचा आग्रह करीत असल्याचे सुरेखाबाई अशोक मराठे ही महिला पोटतिडकीने सांगत होती.
नंदुरबार शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील उमर्दे खुर्द येथील महिलांनी तीन दिवसांपूर्वी तालुका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून दारूच्या व्यसनामुळे होणा:या त्रासाची व्यथा बोलून दाखवली होती़ या महिलांनी पुन्हा दुस:या दिवशी दारू विक्रेत्यांना विरोध केला़ त्यांना मद्यविक्रेत्यांनी दमदाटी केली होती़ यानंतरही निर्भिडता दाखवत महिलांनी दारूचा साठा जप्त करून तो नष्ट केला़ विक्री बंद झाल्याने दोन दिवसांपासून गावात शांतता असली, तरी दारूबंदी कायम रहावी अशी अपेक्षा या महिलांची आह़े ग्रामपंचायतींकडून केल्या जाणा:या ठरावांची वाट बघण्यापेक्षा आधी ठराव अन् मग दारूबंदी असा नवा आदर्श त्यांनी घालून दिला आह़े या महिलांची उमर्दे खुर्द येथे जाऊन भेट घेतली असता, व्यसनाधिनेमुळे गावात अनेकांची वाताहत झाल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी बोलून दाखवल़े
गावात नऊ ठिकाणी होत होती मद्यविक्री
नंदुरबार तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या उमर्दे खुर्द या गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती रोजगारासाठी नंदुरबारात येतो़ यात शासकीय कर्मचा:यांपासून गॅरेजमध्ये काम करणा:या कामगारार्पयत सर्वाचा समावेश आह़े काहींचे व्यवसाय नंदुरबारात असले, तरी घर मात्र उमर्दे येथे आह़े दर महिन्याला या सर्वाच्या माध्यमातून 10 लाख रूपये महिन्याकाठी गावात येतात़ या गावात काही प्रमाणात सुबत्ता आह़े ही सुबत्ता ओळखून गेल्या 10 वर्षात याठिकाणी दारूअड्डे सुरू झाले होत़े दिवसभर नंदुरबार किंवा शेतशिवारातून कमावून आणलेले पैसे या अड्डय़ांवर खर्च होऊ लागल़े साधारण 9 ठिकाणी गावठी दारूसह देशी आणि विदेशी दारूची विक्री होऊ लागली़
सुरूवातील हौस म्हणून पिणारे नंतर पूर्णपणे व्यसनाधिन झाल़े यात कोणचा जीव गेला तर कुणाला गंभीर आजाराची लागण झाली. काहींची घरे तर काहींची शेती गेली, परंतू दारूचे व्यसन कायम होत़े हीच समस्या सोडवण्याचा निर्धार करत महिलांनी दारूविक्रेत्यांना समज देण्याचा प्रयत्न केला़ यात मद्यविक्रेत्यांनी महिलांवर दगडफेक करून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला़ पण खमक्या महिलांनी हातात काठय़ा घेऊन दारूचे मटके आणि बाटल्यातील दारू गटारीत टाकून देत, दारूबंदी होणारच असे ठणकावले आह़े