मोहिद्यात दारूबंदीसाठी महिला सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:50 AM2017-09-10T11:50:06+5:302017-09-10T11:50:12+5:30

Women were persecuted for drunkenness | मोहिद्यात दारूबंदीसाठी महिला सरसावल्या

मोहिद्यात दारूबंदीसाठी महिला सरसावल्या

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील मोहिदे त.श येथील गावात दारूबंदी करीता महिला पुढे सरसावल्या आहेत. या वेळी महिलांनी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गावात दारुबंदी करण्याबाबतचे निवेदन दिले आहे. याप्रसंगी              महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
शहाद्यापासून जवळच असलेल्या मामाचे मोहिदे येथील रणरागिणींनी गावात दारूबंदीकरीता पुढाकार घेतला आहे. याबाबत 7 सप्टेंबर रोजी शहादा पोलीस ठाण्यात जावून पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना दारूबंदीबाबतचे निवेदन दिले आहे. दरम्यान अनेक वेळा महिलांनी वृत्तपत्रांशीही संवाद साधून गावात दारुबंदीबाबत आवाज उठविला होता. मात्र या संदर्भात पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याची महिलांची तक्रार असून, आता थेट कारवाई व्हावी, अशी मागणी आहे.
दारूच्या वेसनामुळे गावातील अनेक तरूण मयत झाले असून, अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे महिलांनी गावात दारूबंदीसाठी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले. दारू बंदी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला.
या निवेदनावर सरपंच गिरधर लिमजी पाटील, पुरूषोत्तम पाटील, लताबाई मोरे, सुमनबाई बैसाणे, बेबीबाई ठाकरे, सुगंधाबाई पेंढारकर, आशाबाई महिरे, सविता महिरे, इंदूबाई महिरे, बेबीबाई इंदवे, सुनिताबाई पानपाटील, रेखाबाई कोळी, सरला कुवर, मिराबाई             लांडगे, सरला कोळी, हिराबाई कोळीसह अनेक महिलांच्या सह्या आहेत. 
दरम्यान संबंधित वरिष्ठ अधिका:यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करण्याची अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे.
 

Web Title: Women were persecuted for drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.