तलवाडे गावात दारुबंदी करण्यासाठी महिलांचा एल्गार
By admin | Published: June 9, 2017 03:34 PM2017-06-09T15:34:43+5:302017-06-09T15:34:43+5:30
प्रशासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.9 - तालुक्यातील तलवाडे बु़गावात दारुबंदी करण्यात यावी यासाठी परिसरातील आदिवासी महिलांनी एल्गार पुकारला आह़े प्रशासनाने यावर तत्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आह़े
नंदुरबार तलवाडे बु़ येथील आदिवासी महिलांनी तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिले आहे. गावात दारुबंदीसाठी वारंवार प्रशासनाकडे दाद मागण्यात आली़ परंतु मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आह़े दारुमुळे गावातील युवापीढीचे भविष्य अंधारात जात आह़े
गावात व्यसनाधिनता वाढत आह़े त्यामुळे पुढील पिढीचे नुकसान होण्यापासून वाचायचे असेल तर गावात दारुबंदी आवश्यक असल्याचे म्हटले आह़े त्याच प्रमाणे गावात दारुची विक्री होत असल्याने यामुळे परिसरातील महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आह़े दरम्यान दहा दिवसात यावर प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला नाही तर याबाबत तिव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांकडून देण्यात आला आह़े निवेदनावर बायजाबाई भिल, शिताबाई भिल, गोजाबाई भिल, सयाबाई भिल, आशाबाई भिल, तुळसबाई भिल, तोलाबाई भिल, सरुबाई भिल, लताबाई भिल, उषाबाई भिल, बनाबाई भिल तसेच संघटनेचे पदाधिकारी मालती वळवी, गणेश सोनवणे, दिनेश भिल, नितेश वळवी, मोहन माळी, राजकुमार वळवी, विपुल गावीत, अमित वळवी आदींच्या स्वाक्ष:या आहेत़