दारुबंदीसाठी उभरांढीच्या महिलांचा मोर्चा
By admin | Published: February 1, 2017 12:25 AM2017-02-01T00:25:36+5:302017-02-01T00:25:36+5:30
उभरांढी येथे दारुबंदी करावी, या मागणीसाठी महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी संघटितपणे निजामपूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत संताप व्यक्त केला
जैताणे : साक्री तालुक्यातील उभरांढी येथे दारुबंदी करावी, या मागणीसाठी महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी संघटितपणे निजामपूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत संताप व्यक्त केला. दारूमुळे तरुण पिढीचे नुकसान होत असून तत्काळ दारुबंदी करावी, अशी मागणी संतप्त झालेल्या महिलांनी आक्रमकपणे केली आहे.
यासंदर्भात निजामपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अजरुन पटले यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, की 26 जानेवारीला ग्रामपंचायत सभेमध्ये दारुबंदीचा ठराव पास करण्यात आला आहे. तरीही अद्याप दारू बंदी झालेली नाही. खुलेआम राजरोसपणे उभरांढी गावात दारू पाडली जात असल्यामुळे गावातील वातावरण बिघडत चालले आहे. यावेळी केवलबाई सावळे, नवसाबाई सावळे, मुक्ताबाई भदाणे, कल्पना ठाकरे, र}ा सावळे, उन्नती सावळे, राजबाई सावळे, सुंदराबाई सावळे, मुक्ताबाई सावळे, शोभा खैरनार, निंबा सावळे, सुनंदा भदाणे, सुरूबाई खैरनार, मिराबाई महाले, रेखा बागुल, उजाभाई भदाणे, शोभा शेलार, शामा शेलार, मंगल शेलार, नीलाबाई शेलार व इतर महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलिसांनी कारवाई करावी
साक्री तालुक्यातील उभरांढीसह, पाचमौली, भोरटीपाडा, रायतेल, पिंझारझाडी व इतर लहान पाडय़ामध्ये हातभट्टीची दारू तयार करण्याचे अवैधपणे सुरू आहे. तसेच बाहेरूनही गावठी दारू गावात आणली जात आहे.
परंतु, संबंधित दारू पाडणा:यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
8 कि.मी. महिला ग्रामस्थांनी केली पायपीट
उभरांढी ते निजामपूर हे अंतर 8 कि.मी आहे. मंगळवारी सकाळी गावातील महिला पायपीट करीत निजामपूर पोलीस स्टेशनवर आल्या. यावेळी त्यांनी दारू विक्री करणा:यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी काही महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे दिसून आले. उभरांढी भाग हा कोरडवाहू शेतीचा म्हणून ओळखला जातो. त्यात गावातील साक्षरताही कमी असल्यामुळे अनेकजण दारूच्या नादी लागले आहे.
त्यामुळे संसार उद्ध्वस्त होत आहे. गावातील काही निवडक व्यक्तींमुळे तरुणाई पण दारूच्या आहारी जात असल्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला.