महिला कक्षाने जुळवला ६५ कुटूंबांचा संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:29+5:302021-07-17T04:24:29+5:30

लाॅकडाऊन काळात बेरोजगारीमुळे सर्वचजण घरात असल्याने आणि आलेल्या आर्थिक अडचणींमुळे घरात पती-पत्नी, सासू-सून, मुलगा आणि वडील अशा नात्यांमध्ये तक्रारी ...

The women's room matched the lives of 65 families | महिला कक्षाने जुळवला ६५ कुटूंबांचा संसार

महिला कक्षाने जुळवला ६५ कुटूंबांचा संसार

Next

लाॅकडाऊन काळात बेरोजगारीमुळे सर्वचजण घरात असल्याने आणि आलेल्या आर्थिक अडचणींमुळे घरात पती-पत्नी, सासू-सून, मुलगा आणि वडील अशा नात्यांमध्ये तक्रारी व भांडणे झाली होती. यातून कौटूंबिक कलहांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते. दुस-या लाटेतही घरातील काैटूंबिक कलह वाढले होते. यातून १७० तक्रारी कक्षाकडे देण्यात आल्या होत्या.

या तक्रारींमध्ये पती बाहेरख्याली वागतो, सासू-सुनेचे पटत नाही, पतीने अनैतिक संबध तसेच पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

समुपदेश केल्यानंतरही वाद मिटत नसल्यास संबधित कुटूंबांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो. दरम्यान काैटूंबिक कलहातून पतीने घराबाहेर काढलेल्या महिलांना कक्षातील अधिकारी अंमलदार यांनी आत्मनिर्भर बनवण्याच्यादृष्टीने घरगुती गृह उद्योग सुरु करण्याबाबत मार्गदर्शन केल्याने काही तक्रारदार महिलांना स्वतचा गृहउद्योग सुरु करता आला दआहे.

पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनात सहायता कक्षाच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नयना देवरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान धात्रक, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रमिला वळवी, विजय बोराडे, प्रीती गावीत, अरुणा मावची आदी कक्षासाठी परिश्रम घेत आहेत.

Web Title: The women's room matched the lives of 65 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.