डांबरीकरण व फरशी पुलांचे काम अपूर्ण दुर्गम भागातील नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:46 PM2018-12-15T12:46:21+5:302018-12-15T12:46:33+5:30
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत कोयलीविहीर -कंकाळामाळ-सिंधीमाळ ते खाई या रस्त्यावर खडीचा दुसरा थर न टाकल्याने वाहन ...
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत कोयलीविहीर -कंकाळामाळ-सिंधीमाळ ते खाई या रस्त्यावर खडीचा दुसरा थर न टाकल्याने वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याच रस्त्यावरील 51 फरशी पूलपैकी 22 पुलांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. या रस्त्याच्या आतार्पयत झालेल्या कामाची चौकशी करून उर्वरित कामे पूर्ण करण्याची मागणी दुर्गम भागातील त्रस्त जनतेकडून होत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर -कंकाळामाळ-सिंधीमाळ ते खाई या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे. खडीचा दुसरा थर न टाकल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. खडी टाकलेली नसल्याने रस्त्यावर उडणा:या धुळीमुळे वाहनधारक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. या रस्त्यादरम्यान 22 फरशी पुलांचे कामही अपूर्णावस्थेत असून दोन ठिकाणी तर कामच केलले नाही. काही ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम आवश्यक असताना संरक्षण भिंती बांधल्या नसल्याने या द:याखो:यातून व घाट सेक्शनमधून जाणा:या रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या साईडपट्टय़ाही केलेल्या नाहीत. तसेच पावसाचे पाणी निघण्यासाठी चारी बनविण्यात आलेल्या नाहीत. या रस्त्यादरम्यान झालेले फरशी पुलांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. काही ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. मात्र डांबरचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच दूरवस्था झाली आहे.
या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण पुलांचे बांधकाम पूर्ण करून झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी खाई येथील सरपंच सेमटीबाई गुलाबसिंग पाडवी, उपसरपंच हांजा प्रभा पाडवी, कंकाळामाळचे सरपंच जलसिंग रतन्या पाडवी, उपसरपंच दिवल्या बाज्या वळवी, ग्रा.पं. सदस्य संपत कालूसिंग पाडवी, वसंत राश्या वसावे, नमी शिवाजी पाडवी, सुनील जोंदा पाडवी, रामा खोजल्या वसावे यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.