कामगार नोंदणी ठरतेय केवळ फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:34 PM2018-07-16T13:34:07+5:302018-07-16T13:34:39+5:30
नंदुरबार : राज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े परंतु कामगारांची नोंदणी करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी अवघ्या चार कर्मचा:यांचे एक पथक नियुक्त केले असल्याने कामगार नोंदणी मोहीम केवळ फार्स ठरु पाहतेय़
4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ‘अटल विश्वकर्मा अभियान’ योजनेंतर्गत खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये हे विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आह़े आतार्पयत या अभियानांतर्गत धुळे येथे 10 हजार 722, तर नंदुरबार येथे 1 हजार 160 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आह़े
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी केवळ चार कर्मचा:यांचे पथक देण्यात आले आह़े त्यातील एक कर्मचारी कारकून असून त्याचा प्रत्यक्ष नोंदणी कामात सहभाग नसल्याची माहिती देण्यात आली आह़े
दरम्यान, धुळे-साक्री, शिरपूर-शिंदखेडा, नंदुरबार-नवापूर व धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा या तालुक्यांसाठी प्रत्येकी एका अधिका:याची नेमणूक करण्यात आली आह़े संपूर्ण राज्यात बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत असत़े परंतु वरील 10 जिल्ह्यांमध्ये विशेष अभियान राबविण्यात येत आह़े या अभियानाला ‘अटल विश्वकर्मा अभियान’ असे नाव देण्यात आले आह़े राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधील बांधकाम कामगार दुर्लक्षित आहेत़ त्यांना शासकीय योजनांची माहिती नसल्याने ते त्यापासून वंचित राहत असतात़ त्यामुळे संबंधितांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांचे जीवनमान उंचवावे यामुळे शासनाकडून अशा कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आह़े
परंतु असे करीत असताना कामगार नोंदणीसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविणे गरजेचे होत़े परंतु तसे न करता केवळ चार सदस्यांच्या पथकावर दोन जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदणीची जबाबदारी आल्याने या अभियानात खोडा निर्माण झाला आह़े
कामगारांची नोंदणी करताना कर्मचा:यांची मोठय़ा प्रमाणात धावपळ होत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे याचा परिणाम कामगारांच्या नोंदणी अभियानावरसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही़