साचलेले पाणी काढण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:06 PM2019-08-12T13:06:35+5:302019-08-12T13:06:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह परिसरात बुधवारी व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहादा शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणावर ...

Workout to remove stagnant water | साचलेले पाणी काढण्यासाठी कसरत

साचलेले पाणी काढण्यासाठी कसरत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरासह परिसरात बुधवारी व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहादा शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. ग्रामीण भागात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांमधील पाणी शहरातील विविध भागात पसरून नवीन वसाहत व शहरातील डोंगरगाव रोड परिसरात गुडघाभर पाणी साचून संपूर्ण परिसर जलमय झाला होता.
शहरातील पटेल रेसिडेन्सी चौक, दर्गा परिसर, विश्रामगृह चौक, दोंडाईचा रस्ता, सदाशिव नगर, रामदेवबाबा नगर, साईबाबा नगर आदी परिसरातील दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. शनिवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नवीन वसाहतीतील साठलेले पाणी कमी होत असून नवीन जनजीवन पूर्वपदावर येत आहे. डोंगरगाव रस्त्यावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने व याच परिसरात मोठे व्यापारी संकुल असल्याने त्यांच्या तळघरात पाणी साचले होते. ते पाणी खाली करण्यासाठी नागरिकांना डिङोल पंपाचे सहाय्य घ्यावे लागत आहे. या पंपाच्या सहाय्याने तळघरातील पाणी खाली करण्यात येत आहे. घरे व दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सारंगखेडा परिसरात
पंचनाम्यांना गती द्यावी
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा व परिसरात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व  पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.   महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. येथील कृषी सहायक  के.डी. नाईक हे पिकांचे झालेल्या नुकसानीचे  पंचनामे करीत आहेत. या पंचनाम्यांसाठी कृषी व महसूल विभागाने जास्त कर्मचारी नेमून पंचनाम्याच्या कामांना गती द्यावी व नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक:यांनी केली आहे.
असलोद येथे 20 घरांच्या
नुकसानीचे पंचनामे
असलोद : शहादा तालुक्यातील असलोद परिसरात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. असलोद गावात  20 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे तलाठी सुरेखा राठोड यांनी केले. तसेच नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी काठावरील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. दुधखेडा गावालगत फरशी तुटल्याने दोन दिवस वाहतूक बंद होती. असलोद येथील जलवाहिनी तुटल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल झाले. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. दुधखेडा धरण पूर्ण भरले आहे. असलोद परिसरातील इतर गावांमध्येही घरांची पडझड झाली असून पंचनाम्यांचे काम सुरू आहे. मात्र शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने ते करण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: Workout to remove stagnant water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.