आकांक्षीत नंदुरबार जिल्हा उपक्रमांतर्गत कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:10 PM2018-07-04T12:10:06+5:302018-07-04T12:10:20+5:30

Workshop conducted by Aspirant Nandurbar District Activities | आकांक्षीत नंदुरबार जिल्हा उपक्रमांतर्गत कार्यशाळा

आकांक्षीत नंदुरबार जिल्हा उपक्रमांतर्गत कार्यशाळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निती आयोगाने आकांक्षीत जिल्हा म्हणून नंदुरबारची निवड केली. या अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य, पोषण, शिक्षण, पाणी व स्वच्छता आदी विभागांच्या कामांमध्ये सुधारणा करणे व निर्देशांकात वाढ करणे यासाठी जिल्हा पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने दोन दिवसीय कार्यशाळा मंगळवारी नंदुरबारात सुरूवात झाली. बुधवारी या कार्यशाळेचा समारोप होणार आहे.
केंद्र शासनाच्या निती आयोगाने नंदुरबार जिल्हा हा आकांक्षीत जिल्हा म्हणून निवड केलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत 2018 ते 2022 दरम्यान जिल्ह्यातील आरोग्य, पोषण,  शिक्षण आणि पाणी व स्वच्छता इत्यादी विभागाशी संबंधीत निर्देशांकात सुधारणा करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिसेफच्या सहकार्याने 3 व 4 जुलै 2018 या दोन दिवसीय अमृतमंथन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत जिल्ह्यातील ग्रामस्तरापासून ते जिल्हास्तरार्पयतचे विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचा सहभाग घेण्यात आलेला आहे.
मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या हस्ते कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी. सोमवंशी, तळोदा प्रकल्प अधिकारी विनय गौडा, नंदुरबार प्रकल्पाधिकारी वनमती, युनिसेफ, पिरॅमल, टाटा ट्रस्टचे राज्यस्तरीय अधिकारी आणि जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी आरोग्य विभाग व महिला बालविकास विभाग यांच्यातर्फे उपस्थित अधिका:यांना आवळ्याची रोपे देवून पोषण बाबत संदेशपर भेटवस्तू देण्यात आल्यात. प्रास्ताविकात डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आकांक्षीत जिल्हा नंदुरबारने आरोग्य, पोषण, शिक्षण, पाणी व स्वच्छता यात विकास साधण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. ग्रामस्तरापासून ते जिल्हास्तरार्पयत प्रत्येक व्यक्तीने सहभागी होवून मानव विकास निर्देशांक अभूतपूर्व बदल करण्याचे आव्हान त्यांनी केले. यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी यांनी दोन दिवसीय कार्यशाळेत सर्व अधिका:यांनी सुक्ष्म नियोजन प्रक्रियेत सहभागी होवून तालुकानिहाय कृषी आराखडा तयार करावा तसेच 100 टक्के अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी व्हावे याबाबत आव्हान केले.
अमृतमंथन कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्वच स्तरावरील अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी असे एकूण 280 सहभागींनी भाग नोंदविला आहे. कार्यशाळेत तालुकानिहाय निती आयोगांतर्गत घेण्यात आलेल्या निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता येणा:या अडचणी व त्यावरील उपाययोजना शोधण्याचे काम या दोन दिवसीय कार्यशाळेत करण्यात येणार आहे. त्यानंतर या कृती आराखडय़ावर आधारीत कामे हाती घेण्यात येणार आहे. यासाठी युनिसेफ मुंबईद्वारे विविध विभागातील तज्ञ मंडळी जिल्ह्यात उपस्थित झालेले असून, त्यांनी दिवसभात उपस्थितांना नंदुरबार जिल्ह्याची सद्य:स्थितीची जाणीव करून देत परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी करावयाच्या कृतीबाबत गटा-गटात बसून चर्चा करणे व निर्देशांकनिहाय अडचणी व त्यावर उपाययोजना शोधण्याकरीता मार्गदर्शन करण्यात आले. डॉ.अपर्णा देशपांडे, डॉ.गोपाळ पंडगे, आनंद घोडके, माधवी पांडे, नंदुरबार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी. बोडके, राज्य पोषण अधिकारी, पिरामल फाऊंडेशन आदी उपस्थित होते.

Web Title: Workshop conducted by Aspirant Nandurbar District Activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.