नंदुरबार येथे वर्षभरात कामगार नोंदणीचे एक शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:58 PM2018-04-05T12:58:28+5:302018-04-05T12:58:28+5:30
कार्यालयाअभावी मजूरांची फरफट : योजना असूनही माहितीअभावी अनभिज्ञ
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 5 : जिल्हानिर्मितीला 20 वर्ष उलटूनही 12 जिल्हा कार्यालयांची प्रतिक्षा आह़े यामुळे जिल्हावासियांची परवड होत असल्याचा प्रत्यय सध्या येत आह़े बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी चालवण्यात येणा:या योजनांची माहितीच मिळत नसल्याने त्यातील लाभांपासून ते अनभिज्ञ आहेत़
जिल्ह्यात आजघडीस किमान 20 हजार बांधकाम कामगार आहेत़ ठिकठिकाणी होणारी खाजगी आणि शासकीय बांधकामे यावर दरनिर्वाह करणा:या कामगारांना ठेकेदाराकडून मिळणारा दैनंदिन रोजगार वगळता कामगार कल्याणाच्या कोणत्याच योजनेतून लाभ मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आह़े बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शासनाकडून वार्षिक 1 कोटी रूपयांर्पयत निधी जिल्हास्तरावर खर्च होत असताना कामगार लाभापासून वंचित असल्याचे चित्र आह़े यामुळे जिल्ह्यात कामगार अधिकारी कार्यालयाच्या निर्मितीची मागणी होऊ लागली आह़े नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी धुळे येथील कामगार अधिकारी कार्यालयात करण्यात येत़े 2010 पासून आजवर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 11 हजार कामगारांची नोंदणी झाल्याची माहिती कार्यालयाने दिली आह़े 18 ते 60 या वयोगटातील कामगारांसाठी विवाह अनुदान, मुलांना शिष्यवृत्ती, आरोग्य विमा, कामगारांना कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास दोन हजारार्पयत खर्च, कामाच्या ठिकाणी अपघात होऊन अपंगत्त्व आल्यास 2 रूपयांची आर्थिक मदत देण्यासह 15 प्रकारच्या योजना चालवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली़
गेल्या 7 वर्षात दोन्ही जिल्ह्यातील 850 लाभार्थी कामगारांना विम्याची रक्कम देण्यात आल्याची माहितीही कार्यालयाकडून देण्यात आली आह़े विविध आजार आणि त्यासाठीचा उपचाराचा खर्च राजीवगांधी जीवनदायिनी योजनेद्वारे करण्यात येत असल्याचे कामगार अधिका:यांनी दिली आह़े एकीकडे शासनाकडून मोठय़ा प्रमाणावर योजना राबवण्यात येत असताना जिल्ह्यात नेमक्या किती लाभार्थीना त्याचा लाभ मिळाला, याबाबत मात्र माहिती कार्यालयाकडे उपलब्ध नाही़ यामुळे कामगाराचे नेमके कल्याण कसे झाले याबाबतच साशंकता आह़े राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी मुंबई येथील मुख्यालय असलेल्या इमारत बांधकाम मंडळांतर्गत केली जात़े शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, बिल्डर यांचा समावेश असलेल्या या मंडळाने बांधकाम कामगारांना कामावर घेताना असंख्य अटी शर्ती घालून दिल्या आहेत़ मंडळाच्या निर्देशानुसार वर्षभर कामगारांच्या नोंदण्या आणि त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजना राबवण्यात येतात़ शासनाच्या जिल्हा कामगार अधिकारी यांच्यामार्फत ह्या योजना राबवण्यात येत असल्या तरी रिक्त पदांमुळे येथेही समस्या आहेत़
आजघडीस नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांसाठी एकच कामगार अधिकारी आह़े नंदुरबार जिल्ह्यात कामगारांची नोंदणी व्हावी यासाठी खाजगी संस्थांची मदत घेण्यात येत आह़े यातून अद्यापर्पयत 60 जणांची नोंदणी झाल्याची माहितीही देण्यात आली आह़े नंदुरबार येथे कार्यालय नसल्याने गरजू कामगार धुळे येथे जावून कामगार असल्याची नोंदणी करून घेतात़ नोंदणी झाल्यावर त्यांना फोटो-ओळखपत्र देण्यात येत़े
शासनाच्या घोषणेनुसार कामगारांच्या मुलांना दज्रेदार शिक्षण, आरोग्य तपासणी, कुशल कामगारांचे प्रशिक्षण याबाबत कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े वर्षभरात किमान दोन वेळा कामगारांच्या योजनांचा आढावा घेण्याची गरज आह़े