जलव्यवस्थापन भक्कम करण्यासाठी कार्यशाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:48 AM2019-12-04T11:48:20+5:302019-12-04T11:49:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाच्या नागपूर येथील केंद्रीय भूमी ...

Workshop on strengthening water management | जलव्यवस्थापन भक्कम करण्यासाठी कार्यशाळ

जलव्यवस्थापन भक्कम करण्यासाठी कार्यशाळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाच्या नागपूर येथील केंद्रीय भूमी जल बोर्डातर्फे 'स्थानिक स्तरावर भूजल प्रबंधन आणि बजेटिंग' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली़ कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे यांच्याहस्ते करण्यात आले़
यावेळी केंद्रीय भूमी जल बोर्डाचे विभागीय निदेशक डॉ. पीक़े़जैन, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, श्रीधर हेगडे ,कार्यकारी अभियंता कल्याण जाटव आदी उपस्थित होते़ कार्यशाळेत डॉ़ जैन यांनी पाण्याचे नियोजन, वापर व पुनर्भरण तसेच दैनंदिन जीवनात किती व कसा पाण्याचा वापर करावा कोणत्या पिकाला किती पाणी लागते हे विविध उदाहरणासह पटवून दिले. स्लाईड शोच्या माध्यमातून आदर्श गाव हिवरे बाजार ,वर्धा जिल्ह्यातील नाला, उमरी मेघे या गावाचे उदाहरण देत ग्रामसभेचे महत्त्व पटवून दिले.
उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी बेडसे यांनी बेडसे यांनी घर चालवताना पगाराच्या पैशाचे नियोजन आपण करत असतो त्याच प्रमाणे गावातील पाण्याचेही नियोजन करणे आवश्यक असून गावाचे क्षेत्र व उपलब्ध होणारे पावसाचे पाणी याचा प्राधान्यक्रम ठरवून उपलब्ध पाण्याच्या आधारे पीक नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगितले़
सूत्रसंचालन जुनेद अहमद तर आभार संदीप वाघमारे यांनी मानले़ यशस्वीतेसाठी अश्विन आटे, क्यथेरीन लुईस, निर्मल कुमार नंदा, एस. बी .पराडकर यांनी परिश्रम घेतले़

Web Title: Workshop on strengthening water management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.