सातपुड्याच्या पायथ्याशी रंगीबेरंगी फुलपाखरांची दुनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 01:31 PM2020-12-10T13:31:49+5:302020-12-10T13:31:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर :  सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा वनक्षेत्रातील वनराईत नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारी फुलपाखरे सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ...

A world of colorful butterflies at the foot of Satpuda | सातपुड्याच्या पायथ्याशी रंगीबेरंगी फुलपाखरांची दुनिया

सातपुड्याच्या पायथ्याशी रंगीबेरंगी फुलपाखरांची दुनिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहिर :  सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा वनक्षेत्रातील वनराईत नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारी फुलपाखरे सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. गंगापूर रोपवाटिका, कुंडलेश्वर तसेच परिसरात असंख्य फुलपाखरांची जत्राच भरत असल्याचे दिसू आले आहे. यात प्रामुख्याने आकर्षक ब्लू टायगर, कॉमन क्रो, प्लेन टायगर, ब्लू मॉर्मन, मोनार्क, काळू, ग्रास यलो यासारख्या नैसर्गिक रंगीबेरंगी मनमोहक अशा विविध प्रजातींच्या फुलपाखरांचा वावर सुरू झाला आहे. या भागातील विविध फुलझाडांवर ही फुलपाखरे भिरभिरताना दृष्टीस पडत आहे. अक्कलकुवा शहरालगत असलेल्या गंगापूर रोपवाटिका, कुंडलेश्वर वनराई परिसर, सोजडान परिसरात पावसाळा संपताच रंगीबेरंगी विविध प्रजातींची आकर्षक फुलपाखरे जास्वंद, बकुळी, बहावा, पानफुटी, कढीपत्ता, बेल, चुना वनस्पती तसेच पावसाळ्यानंतर तग धरून असणाऱ्या रानभाज्यांच्या झुडपांवर भिरभिरताना दिसत आहे. फुलांवर दिसणारी ही फुलपाखरं झाडाझुडपांचे होस्ट प्लांट म्हणून वापर करतात. यातून झाडांवर त्यांचे वास्तव्य वाढून विविध नैसर्गिक रंगछटा आकर्षित करतात. विशेष बाब म्हणजे फुलपाखरे स्वच्छ वातावरणचे प्रतीक मानली जातात. यामुळे या भागातील हवा ही अधिकाधिक शुद्ध झाल्याचे समजून येत असल्याचे वनअभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.
वनविभागाचे लक्ष  
याबाबत अक्कलकुवा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाली गिरी यांना संपर्क केला असता,  आढळून येणारी फुलपाखरे नैसर्गिक देण आहे. यातून हा परिसर सर्व प्रकारच्या जिवांसाठी राहण्यास उपयुक्त असल्याचे स्पष्ट होते. जैवविविधेत भर घालणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेचा वनविभाग सातत्याने अभ्यास करून त्याचे संवर्धन करत आहे. असे त्यांनी सांगितले.

Web Title: A world of colorful butterflies at the foot of Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.