मोड येथे निझरा नदीच्या पाण्याचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:38 AM2019-08-07T11:38:27+5:302019-08-07T11:38:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथे निझरा आलेल्या पुरामुळे नदीपात्रात खोदण्यात आलेले खड्डे पूर्णपणे भरल्याने शेतक:यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथे निझरा आलेल्या पुरामुळे नदीपात्रात खोदण्यात आलेले खड्डे पूर्णपणे भरल्याने शेतक:यांनी आनंद व्यक्त करत जलपूजन केल़े यावेळी ग्रामस्थ उपस्थित होत़े
तळोदा तालुक्यातील विविध भागात गत पाच दिवसात संततधार पावसाने हजेरी लावली़ निझरा नदीच्या उगमक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पुर येऊन धनपूर धरण पूर्णपणे भरले होत़े धरणाच्या सांडव्यातून निघालेल्या पाण्यामुळे निझरा नदी दुथडी भरुन वाहू लागली होती़ यातून मोड येथील ग्रामस्थांनी नदीपात्रात जलसंधारण व्हावे यासाठी खोदलेल्या 13 खड्डय़ांमध्ये जलसाठा झाल्याने पाण्याचा निचरा सुरु झाला होता़ मोड येथे पाहणीसाठी आलेल्या अधिका:यांनी याठिकाणीही भेट देत पाहणी केली होती़
तीन वर्षाच्या कालावधीनंतर नदीला आलेल्या पुराचे तसेच खोदलेल्या खड्डय़ांमधील पाण्याचे पूजन करण्यात आल़े यावेळी सरपंच जयसिंग माळी, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, तहसीलदार पंकजकुमार लोखंडे, माजी सरपंच तापीबाई माळी, पुरुषोत्तम चव्हाण, दिलीप पाटील, ब्रिजलाल चव्हाण, भीमा चौधरी, भगवान चौधरी, जितेंद्र राजपूत, मंगलसिंग राजपूत यांच्यासह मोड आणि आष्टे गावातील शेतकरी उपस्थित होत़े
तळोदा तालुक्यातील धनपूर येथे निझरा नदीवर उभारण्यात आलेल्या धनपूर धरण ओसंडून वाहत आह़े धरणाची पातळी 16 मीटर असल्याने सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आह़े सातपुडय़ात मंगळवारीही पाऊस सुरु असल्याने नदीच्या पाण्यात वाढ झाली आह़े धरणामुळे आसपाच्या गावांसह त:हावदर्पयतच्या 2 हजार 500 हेक्टर जमिनीचे जून 2020 सिंचन होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आह़े