टाकाऊ डांबर सुसरी धरणात टाकल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:47 PM2018-08-19T13:47:45+5:302018-08-19T13:47:51+5:30
सुसरी धरण : शहादा-खेतिया रस्ता रुंदीकरण करणा:या ठेकेदाराचा प्रताप
शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावर दरा फाटय़ाजवळील सुसरी नदीवरील सुसरी धरणात रस्ता काम सुरू असताना त्यातील टाकाऊ खडी व डांबर टाकल्याने शेतक:यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. धरणात टाकलेले हे साहित्य उचलण्याबाबत ठेकेदाराला संबंधित विभागाने तंबी देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या शहादा-खेतिया रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना रस्त्यावरील टाकाऊ डांबर व इतर साहित्य ठेकेदाराने नियोजित जागेवर न टाकता चक्क सुसरी धरणात फेकून दिले. धरणात या टाकाऊ साहित्याचे ढीग लावले आहेत. शासनाकडून दरवर्षी सुसरी धरणातील गाळ काढण्याचे काम केले जाते. सातपुडय़ाच्या पायथ्यातून वाहणा:या या नदीच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने येतो व परिसरातील शेतक:यांना या जलसाठय़ाचा उपयोग होतो. पावसाळ्यापूर्वी परिसरातील शेतकरी आपआपल्या वाहनाने धरणातील गाळ शेतार्पयत मोठय़ा कष्टाने घेऊन जातात. त्यामुळे धरणातील पाण्याच्या साठय़ात वाढ होते. शेतकरी सामूहिकपणे दरवर्षी हा उपक्रम राबवतात. असे असताना शहादा-खेतिया रस्त्याचे रुंदीकरण करणा:या ठेकेदाराने कमालच केली.या ठेकेदाराने कुठलाही विचार न करता रस्त्यावरील वाया जाणारे डांबर डंपराच्या सहाय्याने धरणाच्या मधोमध टाकून दिले आहे. पाण्याच्या प्रवाहाने हे डांबर जर धरणाच्या कडेर्पयत जाऊन पोहोचले तर पाण्याचा निचरा कमी होण्याची शक्यता आहे. टाकाऊ डांबर हे पर्यावरणासाठी धोक्याचे असल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षी येथे नवलपूर ग्रामस्थांमार्फत तीन ते चार महिन्यासाठी मत्सउद्योग केला जातो. जर पाण्यावर तरंगणारे डांबर मासळीच्या पोटात गेले तर या व्यवसायासाठीही धोका निर्माण होऊ शकतो. संबधित लघुसिंचन विभागाच्या अधिका:यांनी धरणात टाकलेले डांबर तात्काळ उचलण्याबाबत संबंधित ठेकेदाराला तंबी द्यावी, अशी अपेक्षा या शेतक:यांकडून व्यक्त होत आहे.