यंदा अवघा 90 दिवसांचा साखर हंगाम

By admin | Published: February 5, 2017 12:30 AM2017-02-05T00:30:41+5:302017-02-05T00:30:41+5:30

तीनपैकी दोन कारखाने झाले बंद : ऊस पळवापळवीमुळे बसला फटका, पुढील वर्षी मुबलक ऊस

This year, the 90-day sugar season | यंदा अवघा 90 दिवसांचा साखर हंगाम

यंदा अवघा 90 दिवसांचा साखर हंगाम

Next

नंदुरबार : जिल्ह्यातील साखर हंगाम समारोपाकडे वाटचाल करीत आहे. सातपुडा साखर कारखाना व आदिवासी साखर कारखान्याचा हंगाम संपला असून येत्या आठवडय़ात खाजगी तत्त्वावरील ऑस्टोरिया शुगर कारखान्याचा गाळप हंगामदेखील संपणार आहे. यंदा अवघा 90 ते 100 दिवसच साखर हंगाम राहिल्याने ऊसतोड मजुरांसह त्यावर आधारित मजुरांना किमान नऊ महिने आता दुसरे काम शोधावे लागणार आहे.
यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून साखर हंगामाला सुरुवात झाली होती. ऊस कमी असल्यामुळे अनेक कारखान्यांनी जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी आटोकाट प्रय} केले. परंतु अपेक्षित गाळप कुठलाच कारखाना करू शकला नाही.
तिन्ही कारखाने झाले होते सुरू
यंदा जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी गाळप केले. गाळप क्षमतेबाबत सातपुडा साखर कारखाना सर्वाधिक अर्थात पाच हजार मेट्रिक टन दैनंदिन ऊस गाळप क्षमतेचा आहे. त्या खालोखाल खासगी तत्त्वावरील अॅस्ट्रोरिया शुगर हा कारखाना असून तेथे दैनंदिन अडीच हजार मे.टन ऊस गाळप होतो तर नवापूरचा आदिवासी साखर कारखाना साडेबाराशे मे.टन दैनंदिन गाळप क्षमतेचा आहे. यंदा तिन्ही साखर कारखान्यांनी वेळेवर गाळप सुरू केले होते.
ऊस पळवापळवी
गेल्या दोन वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे दोन वर्षात ऊस लागवड घटली होती. त्याचा परिणाम साहजिकच ऊस टंचाईवर यंदाच्या गाळप हंगामात झाला. तिन्ही साखर कारखान्यांना ऊस टंचाईला यंदा सामोरे जावे लागले. नाशिक, नगर तसेच गुजरातमधील काही साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस मिळविण्यासाठी यंदा आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी काही कारखान्यांनी गावोगावी प्रतिनिधी पाठवून शेतक:यांचा ऊस मिळविण्यासाठी प्रय} केला तर काहींनी तालुकास्तरावर गट कार्यालयेदेखील सुरू केली होती. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या उसापैकी 20 ते 25 टक्के ऊस जिल्ह्याबाहेरील कारखान्यांनी यंदा पळविल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा परिणाम जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांच्या गाळपावर झाला   आहे.
मजूर, कामगारांचे होणार हाल
यंदा अवघ्या अडीच ते तीन महिन्यातच साखर हंगाम आटोपल्याने कामगार, ऊसतोड मजूर आणि कारखान्यांवर आधारित इतर घटकांची मोठी हाल होणार आहे. तब्बल नऊ ते दहा महिने त्यांना वेगळा रोजगार शोधावा लागणार आहे. उसाची पुरेशी उपलब्धता असल्यास साखर हंगाम साधारणत: मार्च महिन्याच्या मध्यार्पयत किंवा अखेर्पयत चालतो. त्यानंतर जुलैपासून कामगारांना पुढील गाळप हंगामाच्या तयारीसाठी कारखान्यांमध्ये कामावर घेतले जाते. परिणामी चार ते पाच महिनेच कामगारांना दुसरा रोजगार शोधावा लागतो. यंदा मात्र तो कालावधी मोठा राहणार आहे. 
पुढील वर्षी जादा ऊस
यंदा पजर्न्यमान चांगले असल्यामुळे आणि भूगर्भातील पाणी पातळीदेखील समाधानकारक असल्यामुळे यंदा ऊस लागवडीचे प्रमाण ब:यापैकी आहे. त्यामुळे पुढील साखर हंगामासाठी तिन्ही साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तिन्ही साखर कारखान्यांनी नियोजनदेखील केले आहे.


आस्टोरिया शुगर जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक गाळप खाजगी तत्त्वावरील अॅस्ट्रोरिया शुगर कारखान्याने केले आहे. हा कारखाना 2फेब्रुवारीर्पयत एकूण 84 दिवस चालला असून तीन लाख सहा हजार 380 मे.टन ऊस गाळप करून दोन लाख 86 हजार 810 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 9.41 टक्के राहिला.


सातपुडा कारखाना
सातपुडा साखर कारखान्याने 2 फेब्रुवारीर्पयत एकुण 84 दिवस ऊस गाळप केला. एकूण दोन लाख 61 हजार 120 मे.टन ऊस गाळप करून दोन लाख 36 हजार 425 क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा 9.16 राहिला आहे. कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार मे.टन आहे.

आदिवासी कारखाना
आदिवासी साखर कारखान्याने यंदा 67 दिवस गाळप केले. त्यांनी 85 हजार 503 मे.टन ऊस गाळप करून 77 हजार 830 क्विंटल साखर उत्पादित केली. सरासरी साखर उतारा 9.10 इतका राहिला.
आदिवासी साखर कारखान्याचा गाळप हंगामाचा समारोप यंदा जानेवारी महिन्यातच झाला. 21 जानेवारी रोजी कारखाना बंद झाला. कारखान्याची गाळप क्षमता साडेबाराशे मे.टन आहे.


4सातपुडा साखर कारखान्याचा गळीत हंगाम शनिवार, 4 फेब्रुवारी रोजी संपला असून आदिवासी साखर कारखान्याचा हंगाम गेल्याच महिन्यात संपला. पुढील आठवडय़ात अॅस्ट्रोरिया शुगर कारखान्याचादेखील गळीत हंगामाचा समारोप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा कारखान्यांचा साखर हंगाम 90 ते 100 दिवसांच्या दरम्यानच राहिला आहे. गेल्यावर्षी 120 ते 130 दिवसांच्या दरम्यान साखर हंगाम होता.

तिन्ही साखर कारखान्यांच्या परिसरात यंदा ऊसतोड मजुरांच्या     पाल्यांसाठी साखर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे   विद्याथ्र्याची शिक्षणाची ब:यापैकी सोय झाली होती. आता या विद्याथ्र्याना पुन्हा आपल्या गावाच्या शाळेत दाखल करावे लागणार असल्यामुळे या विद्याथ्र्याच्या शिक्षणाची एकप्रकारे परवडच होणार असल्याचे स्पष्ट     आहे.
 

Web Title: This year, the 90-day sugar season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.