शेतकरी, व्यापा:यांच्या दृष्टीने यंदाची दिवाळी हिरमोड करणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:09 PM2019-10-27T12:09:39+5:302019-10-27T12:10:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे दिवाळीचा उत्साह तर दुसरीकडे पावसाचा कहर अशी स्थिती सध्या दिसून येत आहे. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकीकडे दिवाळीचा उत्साह तर दुसरीकडे पावसाचा कहर अशी स्थिती सध्या दिसून येत आहे. यामुळे बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. वातावरणातील वारंवारच्या बदलांमुळे साथीचे आजार आणि डेंग्यूची साथ थैमान घालत आहे. यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरंजन पडले आहे.
यंदाची दिवाळी पावसातच जात असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून कुठे तुरळक तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. तीन दिवसांपासून तर सूर्यदर्शन देखील झालेले नाही. दिवाळीसारखा हर्ष उल्लास आणि आनंदाच्या सणावर पावसाने व्यत्यय आणला आहे. त्यामुळे व्यापा:यांसह सर्वसामान्यांचा हिरमोड झाला आहे.
पिकांचे नुकसान
खरीप पिकाची काही ठिकाणी काढणी झाली आहे तर काही ठिकाणी काढण्याच्या स्थितीत आहेत. त्यातच पावसाचा कहर सुरू असल्यामुळे शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला जात आहे. यंदा चांगले पजर्न्यमान, चांगली पीक परिस्थिती यामुळे शेतकरी वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण होते. परंतु पावसामुळे ज्वारी, सोयाबीन, मका यांना कोंब फुटू लागले आहेत. काही ठिकाणी कणसं सडली आहेत. यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे.
व्यापा:यांचा हिरमोड
दिवाळीचा खरेदीचा उत्साह सर्वत्र असतांना पावसाच्या संततधारेमुळे त्यावर परिणाम दिसून येत आहे. विशेषत: लहान व रस्त्यावरच्या व्यापा:यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
याउलट इलेक्ट्रॉनिक वस्तू, चैनिच्या वस्तूंना मागणी चांगली असल्यामुळे मोठे व्यापारी समाधानी आहेत. परंतु हातावर पोट असलेल्या व्यापा:यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाल्यामुळे मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. अनेक व्यापा:यांनी ती खंत बोलून देखील दाखविली आहे. आधीच पावसाळ्यात मंदीचे सावट होते आता दिवाळीतही अपेक्षीत व्यवसाय न झाल्याने नाराजीही व्यक्त केली.
उलाढाल निम्म्यावर.. यंदाच्या दिवाळीतील उलाढाल निम्म्यावर आली आहे. निवडणुकांमुळे 21 तारखेर्पयत बाजारात फारशी रौनक नव्हती. निवडणुका संपल्यानंतर पावसाने व्यत्यय आणला आहे. यामुळे दिवाळीसारख्या सणाला व्यवसाय होत नसल्याने लहान व मध्यम व्यापारी हैराण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी पावसाने उघडीप दिल्याने आणि वातावरणही सर्वसामान्य राहिल्याने बाजारात मोठय़ा प्रमाणावर गर्दी उसळली होती. दोन दिवसांपासून तर वर्दळच कमी झाल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. यामुळे दिवाळीसाठी लागणा:या वस्तूंची मागणी निम्म्यावर आली आहे.