दुष्काळी कामांना यंदा वॉटरकपची झालर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:10 PM2018-12-10T13:10:45+5:302018-12-10T13:10:49+5:30

यंदाही दोनच तालुके : दुष्काळ संकट नाही तर कामांची संधी समजणार

This year's watercache fray for drought | दुष्काळी कामांना यंदा वॉटरकपची झालर

दुष्काळी कामांना यंदा वॉटरकपची झालर

Next

नंदुरबार : : पाणी फाऊंडेशनअंतर्गत यंदाही केवळ नंदुरबार व शहादा तालुक्यातच स्पर्धा घेण्यात येणार आहे. या दोन्ही तालुक्यातील 287 ग्रामपंचायती व त्यातील 346 गावांमध्ये ही स्पर्धा राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दम्यान, गेल्यावर्षी दोन्ही तालुक्यातील 83 गावांनी सहभाग घेतला होता. काही गावांनी चांगले कामे केलीही परंतु यंदा अपेक्षीत पजर्न्यमानच झाले नसल्याने या कामांची उपयोगितेचा अनुभव गावक:यांना येवू शकला नाही.
पाणी फाऊंडेशनने यंदा ही स्पर्धा जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा तालुक्यात व्यापक स्वरूपात राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी आतापासूनच गावागावात ग्रामसभा घेवून गावक:यांना या स्पर्धेविषयी माहिती देवून सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. जे गावे सहभागी होतील त्या गावातील प्रत्येकी पाच जणांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्यक्षात स्पर्धा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे.
यंदा दुष्काळाचे गंभीर सावट असल्यामुळे हे संकट न समजता या कामांबाबत संधी समजून जास्तीत जास्त गावांना या माध्यमातून कामे करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पाणी फाऊंडेशनचा प्रय} आहे. त्यासाठी फाऊंडेशनचे समन्वयक तात्या भोसले हे गावोगाव पिंजून काढत आहेत. गावकरी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, या क्षेत्रात काम करणारे समाजसेवक यांच्यासह संस्था व संघटनांशी त्यांनी संपर्क सुरू केला आहे. त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
यंदा शाळांना सहभागी करणार
यंदा शालेय विद्याथ्र्याचा सहभाग वाढावा यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न करण्यात येणार आहे. दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी दहा शाळा निवडून त्यातील सातवी ते नववीच्या 30 विद्याथ्र्याची निवड करण्यात येईल. या विद्याथ्र्याना पाण्याचे महत्व आणि जलसंधारण याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. जेणेकरून हे विद्यार्थी आपल्या गावात, आपल्या कुटूंबात या कामाबाबत, उपक्रमाबाबत चर्चा करून त्याचे महत्त्व पटवून देत गावक:यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करणार आहेत. निवडलेल्या 20 शाळांमध्ये दोन्ही तालुकास्तरावर स्पर्धा देखील होईल. यात विद्याथ्र्यानी जलसंधारणासंदर्भात मॉडेल तयार करून त्याची उपयोगिता दाखवायची आहे. त्याची पहाणी करण्यासाठी राज्य स्तरावरील तज्ज्ञ व्यक्तींना पाचारण करण्यात येणार असून संबधीत शाळांना गौरविण्यात येणार आहे.
यंदाही काही संस्था, 
संघटनांचा सहभाग
स्पर्धेत यंदाही संस्था व संघटनांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर राहणार आहे. गेल्यावर्षाप्रमाणे बीजेएस अर्थात भारतीय जैन संघटना देखील सक्रीय सहभाग नोंदविणार आहे. याशिवाय नाम संघटना देखील यंदा या उपक्रमात सक्रीय योगदान देणार आहे. 
जिल्हा प्रशासनातर्फे दुष्काळी स्थितीच्या पाश्र्वभुमीवर जास्तीत जास्त कामे हे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. काही अधिका:यांना किमान पाच ते दहा गावांची जबाबदारी देखील सोपविण्यात येणार आहे. 
 

Web Title: This year's watercache fray for drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.