येळकोट, येळकोटच्या गजरात भंडारा उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:05 PM2020-12-21T12:05:12+5:302020-12-21T12:05:18+5:30

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय यासह खंडेराव महाराजांच्या जयघोष करीत ...

Yelkot, Bhandara Udhalana in Gajrat of Yelkot | येळकोट, येळकोटच्या गजरात भंडारा उधळण

येळकोट, येळकोटच्या गजरात भंडारा उधळण

Next

n  लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय यासह खंडेराव महाराजांच्या जयघोष करीत भाविकांनी चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराज मंदिरात तळी भरून महाआरती करून भंडाऱ्याची केली उधळण       केली.
शहरातील रेल्वे फाटकाजवळ खंडेराव महाराज मंदिरात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चंपाषष्ठी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदा साध्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला. यात भाविकांनी सहभाग नोंदविला. 
महापूजा महाआरती तळी भरणे व भंडाऱ्याची उधळण करणे यासह विविध कार्यक्रम खंडेराव महाराज मंदिरात संपन्न झाले. येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण करीत कोरोनाचे संकट लवकर जावे यासाठी प्रार्थना केली. यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
 कार्यक्रमाला यशवंत गुळमकर, ज्ञानेश्वर भडगर, रवींद्र चौधरी, महादेव भडगर, भास्कर शिंदे, संजय राजपूत, जय शिंदे, शेखर कोतवाल, अर्जुन हटकर, किरण सैंदाणे यांच्या सर्व भाविक उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्यात इतर ठिकाणीही चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 
दरवर्षी नंदुरबारातील मंदीरावर सामुहिक भंडारा देखील आयोजित करण्यात येतो. यंदा मात्र कोरोनाच्या संकटकाळात भंडारा रद्द करून      गर्दीवर देखील नियंत्रण ठेवण्यात आले होते. 

Web Title: Yelkot, Bhandara Udhalana in Gajrat of Yelkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.