तरूण शेतक:यांना मिळणार ‘भाडोत्री’ जमिन

By admin | Published: June 21, 2017 03:10 PM2017-06-21T15:10:24+5:302017-06-21T15:10:24+5:30

शुभ वर्तमान : रांझणी गावच्या पंचांचा निर्णय

Young farmers will get 'Bhadotri' land | तरूण शेतक:यांना मिळणार ‘भाडोत्री’ जमिन

तरूण शेतक:यांना मिळणार ‘भाडोत्री’ जमिन

Next

 ऑनलाईन लोकमत 

रांझणी,दि.21- युवकांचा शेतीक्षेत्रात सहभाग वाढवा, यासाठी तळोदा तालुक्यातील रांझणी येथील ज्येष्ठांनी भाडेपट्टय़ाने जमिन देण्याची पद्धत अवलंबली आह़े याअंतर्गत गावठाणच्या मालकीच्या जमिन देण्यात आली आह़े तळोदा तालुक्यात हा पहिलाच प्रयत्न असल्याने सर्वस्तरातून त्याचे स्वागत होत आह़े  
विठ्ठल मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या तळोदा तालुक्यातील रांझणी येथे गावठाणची तब्बल 14 एकर जमिन आह़े गावाला लागून असलेली ही जमिन गेल्या अनेक वर्षापासून पडून होती़ या जमिनीचा काहीतरी उपयोग व्हावा अशी चर्चा गावात नेहमी होत होती़ मात्र याबाबत ठोस असा काही निर्णय झाला नव्हता़ यावर तोडगा काढत गावातील माजी सैनिक श्रावणगीर गोसावी यांनी ग्रामस्थांना संघटीत करून युवा शेतक:यांना ही जमिन वार्षिक कराराने भाडय़ाने देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची संकल्पना मांडली होती़ त्यानुसार गावातील विठ्ठल मंदिरात बैठक घेण्यात येऊन श्रावणगीर गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर चर्चा झाली़ यात सर्वप्रथम काशिनाथ भटा कदम, प्रल्हाद ओंकार भारती, शांताराम चिंधू मराठे आणि जालमसिंग चांदू पाडवी यांची पंच म्हणून निवड करण्यात आली़ या बैठकीतच या जमिनीचा लिलाव करण्यात आला़ या गावातील तरूण शेतकरी सोनू तारांचद पाडवी याने सर्वाधिक बोली लावल्याने त्याना वर्षभरासाठी ही जमिन कसण्यासाठी देण्यात आली आह़े 14 एकर क्षेत्रात येणा:या क्षेत्रात सोनू पाडवी याने कापूस आणि ज्वारी पेरणी करण्याचा मानसही याठिकाणी जाहिर केला़ त्याला पंच आणि उपस्थित ग्रामस्थांनी संमती दिली़ 
लिलावातून आलेली रक्कमही  तिन पंचाच्या नावे खाती उघडून बँकेत ठेवण्यात येणार आह़े या रकमेतूनच या जमिनीचा परिपूर्ण विकास करण्याची योजना पंच मंडळाने या बैठकीत बोलून दाखवली़ तळोदा तालुक्यात गावठाणच्या जमिन युवा शेतक:यांना देण्याच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आह़े 
 
उपक्रमाचे रांझणीत उत्साहात स्वागत 
हाया नंबर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जमिनीची मशागत सोनू पाडवी याने नुकतीच केली आह़े गावातील सर्वानीच या उपक्रमाचे उत्साहात स्वागत केले आह़े येत्या काळातही या जमिनीचा वापर युवकांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े
 
गावाचे प्रश्न हे गावातच सोडवले जावेत़ गावातील हाया नंबर ही जमिन शेतक:यांना उत्पन्न देणारीच आह़े यात युवक शेतक:यांना सामील करून घेण्याची गरज आह़े युवक शेती क्षेत्रात स्वयंपूर्ण झाल्यास भविष्याची काळजी मिटणार आह़े या जमिनीला कुंपण करणार आह़े 
-श्रावणगीर दामूगीर गोसावी, माजी अध्यक्ष तंटामुक्त समिती, रांझणी़ 
 
ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात युवकांना चांगली संधी मिळाली आह़े तिचा लाभ घेतला गेला पाहिज़े या शेतीतून दोन्ही गोष्टींचा विकास साधता येईल, युवकांना उत्पन्न आणि पंचमंडळाकडे पैसा येणार आह़े त्याचा विनियोग हा चांगल्या कामांसाठी करत येणे शक्य होईल़ 
-डॉ़ योगेश कदम, ग्रामस्थ,
 रांझणी ता़ तळोदा़ 

Web Title: Young farmers will get 'Bhadotri' land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.