नंदुरबारात तरुणाईने लुटला यांत्रिकी पोळ्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:36 PM2019-08-31T12:36:55+5:302019-08-31T12:37:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतीत यांत्रिकीकरणाच्या  वापरामुळे बैलांची संख्या कमी झाल्याने बळीराजाचा सण साजरा करण्यासाठी येथील तरुण शेतक:यांनी ...

Young man robbed of a mechanical hive in Nandurbar | नंदुरबारात तरुणाईने लुटला यांत्रिकी पोळ्याचा आनंद

नंदुरबारात तरुणाईने लुटला यांत्रिकी पोळ्याचा आनंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतीत यांत्रिकीकरणाच्या  वापरामुळे बैलांची संख्या कमी झाल्याने बळीराजाचा सण साजरा करण्यासाठी येथील तरुण शेतक:यांनी लहान ट्रॅक्टरची मिरवणूक काढून अनोखा आनंद लुटला. 
यंदा अतिवृष्टीमुळे असंख्य शेतक:यांचे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या उत्पन्नात मोठी घट होणार असल्याने शेतक:यांमध्ये चिंतेचे वातावरण असताना पोळ्याचा सण साजरा झाला. त्यासाठी सकाळपासून शेतक:यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. बहुतांश शेतक:यांकडे बैल नाहीत. यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने असंख्य शेतक:यांनी बैल विक्री केले आहेत. त्याऐवजी शेतक:यांच्या दारी छोटे ट्रॅक्टर दिसून येते. हे ट्रॅक्टरच ‘सर्जा राजा’चे काम करीत असल्याने या भागातील शेतकरी ज्यांच्याकडे बैल नाहीत ते बैलांऐवजी ट्रॅक्टरची पूजा करून मिरवणूक काढण्याची प्रथा गेल्या चार-पाच वर्षापासून रुढ झाली आहे. यावर्षी देखील नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सायंकाळी ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात आली. नंदुरबार शहरातील माळीवाडा भागातील तरुण शेतक:यांनी ट्रॅक्टर सजवून त्याची वाजत-गाजत शहरातून मिरवणूक काढली. शहरवासीयांसाठी ही मिरवणूक लक्षवेधी ठरली होती.

Web Title: Young man robbed of a mechanical hive in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.