युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणा:या तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:31 PM2019-12-01T12:31:53+5:302019-12-01T12:31:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नंदुरबारातील दोन महिलांसह तिघा जणांविरुद्ध चार महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला ...

Young people commit suicide: crime on all three | युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणा:या तिघांवर गुन्हा

युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणा:या तिघांवर गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नंदुरबारातील दोन महिलांसह तिघा जणांविरुद्ध चार महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. 
दिपक चंद्रकांत चौधरी, (26) रा.मधुबन नगर, नंदुरबार असे मयत युवकाचे नाव आहे. 26 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ही घटना शहरातील वळण रस्त्यावरील राजपूत पेट्रोल पंपासमोरील टायरच्या दुकानाच्या मागे घडली होती. युवकाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले होते. उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच्याशी प्रविण रुपचंद चव्हाण व दोन महिला यांनी हातापाई करून पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच त्याने स्वत:ला जाळून घेतल्याचा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. सुनील चंद्रकांत चौधरी यांनी फिर्याद दिल्याने प्रविण चव्हाणसह दोन महिलांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक बि:हाडे करीत आहे.
 

Web Title: Young people commit suicide: crime on all three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.