अस्तंबा यात्रेसाठी युवा भाविकांचे जत्थे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:17 PM2017-10-17T13:17:09+5:302017-10-17T13:17:36+5:30
सिग्गरवाले बाबाचा जयघोष : तळोदा शहरात तीन राज्यातून यात्रेकरू होताहेत दाखल
नंदुरबार : सातपुडय़ाच्या तिस:या पर्वत रांगेतील सर्वोच्च अस्तंबा शिखरावरच्या अस्तंबा ऋषीच्या यात्रोत्सवाला सुरूवात मंगळवारपासून सुरूवात होत आह़े या पाश्र्वभूमीवर सिग्गरवाले बाबा की, जय असा जयघोष करत शेकडो युवकांचे जत्थे सोमवारपासून रवाना होण्यास सुरूवात झाली़ साहसपर्यटन आणि अध्यात्म असा दुहेरी संगम असलेल्या या यात्रोत्सवात यंदा किमान 40 हजार भाविक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
कोठार ता़ तळोदा येथून अक्कलकुवा तालुक्यातील अस्तंबर येथर्पयत 70 किलोमीटर सातपुडय़ाच्या डोंगररांगेतून पायी प्रवास करण्यासाठी धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील खेतिया, पानसेमल येथील भाविक रविवारी सायंकाळपासून तळोदा येथे दाखल झाले होत़े सातपुडय़ातील द:याखो:यांमधील धोकेदायक वळणे, डोंगररांगेतील पायवाटा आणि चढाव यावरून पायी प्रवास करत हे भाविक मंगळवारी सकाळी अस्तंबा येथे पोहोचणार आहेत़ सुमारे 15 दिवस चालणा:या यात्रेत नंदुरबार जिल्ह्यासह धुळे, साक्री, शिरपूर, मध्यप्रदेशातील खेतिया, गुजरात राज्यातील निझर, सेलंबा, सागबारा, उच्छल येथील युवक सहभागी होतात़ यात्रेकरूंना तळोदा शहर मध्यवर्ती असल्याने याच ठिकाणाहून यात्रेकरू एकमेकांच्या साथीने सातपुडय़ाच्या माथ्याकडे कूच करतात़
मंगळवारी सकाळपासून अस्तंबा ऋषीचे पूजनानंतर यात्रोत्सव सुरू होणार असल्याने अस्तंबा परिसरात व्यावसायिक दाखल झाले असल्याची माहिती आह़े