अॅण्टी कोवीड फोर्ससाठी युवक, नोकरदार सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:47 PM2020-04-24T12:47:47+5:302020-04-24T12:47:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याची लोकसंख्या, वाढलेला विस्तार, दोन राज्यांची सिमा, दुर्गम भाग लक्षात घेता कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याची लोकसंख्या, वाढलेला विस्तार, दोन राज्यांची सिमा, दुर्गम भाग लक्षात घेता कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर पोलीस दलालाही मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात अॅण्टी कोवीड फोर्स हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी राबविला आहे. त्यासाठी कर्मचारी, युवक, माजी सैनिक यांना आवाहन करण्यात आले असून त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सांभाळतांना कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन आणि संचारबंदी याचा ताण पोलीस दलावर आला आहे. याशिवाय राज्यात इतर ठिकाणी बंदोबस्तासाठी मागणीप्रमाणे पोलीस कर्मचारी पाठविणे आलेच. अशा वेळी सुमारे 18 ते 20 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात पोलिसांना मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेता गावागावात यापूर्वी ग्राम सुरक्षा दलाचा उपक्रम राबविण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता शहरी भागासह मोठय़ा गावांमध्ये अॅण्टी कोवीड फोर्स अंतर्गत नागरिकांमधील पोलीस नेमला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. यात नाव, पत्ता, वय, आधारकार्ड क्रमांक, नोकरीचा तपशील, रक्तगट, आजाराचा संदर्भ याची माहिती भरावयाची आहे.
त्यानंतर संबधीत विभागाच्या पोलीस ठाण्यातून अर्ज केलेल्याला ओळखपत्र दिले जाईल. त्या पोलीस ठाण्याअंतर्गत ज्या ठिकाणी बंदोबस्तासाठी आवश्यकता असेल त्या ठिकाणी नियुक्त केलेल्यांना बंदोबस्तासाठी नेमण्यात येईल. यासाठी कुठलेही मानधन राहणार नाही, केवळ देशसेवा हाच उद्देश त्यामागे आहे. यात अनेक सुशिक्षीत युवक, शिक्षकवर्ग, माजी सैनिक सहभागी होत आहेत.
विविध संघटना, राजकीय पक्ष यांनी यासाठी आपल्या कार्यकत्र्याना तयार केले आहे. तसे आवाहन देखील करण्यात येत आहे. भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी आपल्या कार्यकत्र्याना जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.