भरधाव डंपरच्या धडकेत ठाणेपाड्यातील युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:22+5:302021-07-17T04:24:22+5:30

ठाणेपाडा येथील अनिल युवराज गवळी (२५) व संकेत मदन चाैधरी (२१) हे दोघेही एमएच १८ टी ८६३९ या दुचाकीवरून ...

Youth from Thane Pada killed in Bhardhaw dumper collision | भरधाव डंपरच्या धडकेत ठाणेपाड्यातील युवकांचा मृत्यू

भरधाव डंपरच्या धडकेत ठाणेपाड्यातील युवकांचा मृत्यू

Next

ठाणेपाडा येथील अनिल युवराज गवळी (२५) व संकेत मदन चाैधरी (२१) हे दोघेही एमएच १८ टी ८६३९ या दुचाकीवरून नंदुरबार ते साक्री रस्ता मार्गाने ठाणेपाडा रोपवाटिकेकडे जात असताना, मागून येणाऱ्या एमएच १५ जीव्ही ८७७९ या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने भरधाव वेगात येऊन त्यांना धडक दिली. धडकेत दुचाकी चालविणारा युवक संकेत चाैधरी हा जागीच ठार झाला, तर मागे बसलेला अनिल गवळी हा गंभीर जखमी हाेऊन उपचारादरम्यान मृत झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणेपाडा येथील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.

दरम्यान, याबाबत सुनील युवराज माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच १५ जीव्ही ८७७९ वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर चालक पसार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. साक्री ते नंदुरबारदरम्यान वाळू वाहतुकीची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत असून भरधाव वेगातील डंपरना अटकाव करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Youth from Thane Pada killed in Bhardhaw dumper collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.