‘ङिारो पेडन्सी’साठी जि.प. सरसावली
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: October 3, 2017 12:35 PM2017-10-03T12:35:16+5:302017-10-03T12:38:37+5:30
अद्ययावत रेकॉर्ड रूम : संयुक्त धुळेसह स्वतंत्र नंदुरबार जि.प.च्या रेकॉर्डचे वर्गीकरण
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या रेकॉर्डला आता चांगली शिस्त लागून त्याआधारे ‘ङिारो पेडन्सी’ करण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे यांनी सुरू केला आहे. त्यासाठी 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत अद्ययावत रेकॉर्ड रूम तयार होत असून 30 वर्ष जुनी फाईली एका मिनिटात सहज उपलब्ध होईल या दृष्टीने वर्गीकरण केले जात आहे.
शासकीय कार्यालयांचे रेकॉर्ड रूम म्हटले म्हणजे सर्वच अस्ताव्यस्त कारभार. एखादी फाईल, कागदपत्र शोधायचे म्हटल्यास संबधितांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. जिल्हा परिषदेत देखील यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे रेकॉर्ड अद्ययावत राहावे, ङिारो पेडन्सी असावी यासाठी पुणे विभागात काम करण्यात आले. त्याची दखल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सुचना केल्याने हे अभियान राबविण्यात येत आहे.
नंदुरबार जि.प.आघाडीवर
नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे यांनी ही बाब गांभिर्याने घेतले. त्यासाठी 1 ऑक्टोबरची वाट न पहाता गेल्या आठवडय़ापासून त्यांनी या कामाला सुरूवात केली. आधी जे रेकॉर्डरूम होते त्याची दुरूस्ती करण्यात आली. रेकॉर्डरूमच्या नियमानुसार आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून घेण्यात आल्या.
पाणी, वारा, बाष्पीभवन यापासून कागदपत्रांचे नुकसान होणार नाही, पुरेशी प्रकाश व्यवस्था राहील यादृष्टीने सुविधा उपलब्ध करून घेण्यात आल्या.
सुटीच्या दिवशीही काम
या कामासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचा:यांना सुटीच्या दिवशीही कामाला बोलविण्यात आले आहे. रविवार सुटीचा दिवस आणि सोमवारी म.गांधी जयंतीदिनाची सुटी या दोन्ही दिवशी सर्व विभागातील कर्मचारी कार्यालयात जावून आपल्या कार्यालयातील रेकॉर्डचे वर्गीकरण करणार आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाजाचा दिवशी देखील काही कर्मचारी या कामासाठी राबणार आहेत. त्या त्या विभागाचे प्रमुख आपापल्या विभागातील कामावर लक्ष ठेवून आहेत.
पहिल्यांदाच..
जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर अर्थात 1998 नंतर तब्बल 19 वर्षानंतर प्रथमच रेकॉर्डचे अद्यावतीकरण करण्यात येत आहे. धुळे जिल्हा परिषदेतून वेगळा झालेला जिल्हा परिषदेचा कारभार सुरुवातीला पंचायत समितीमध्ये, त्यानंतर पंचायत समितीच्या नवीन इमारतीमध्ये राहिला. अगदी कमी जागेत दाटीवाटीने अनेक कार्यालये थाटण्यात आली होती. त्यानंतर आठ वर्षापूर्वी नव्या इमारतीत जिल्हा परिषदेचा कारभार सुरू झाला. या दरम्यान जिल्हा परिषदेचे सर्व दप्तर एका ठिकाणाहून दुस:या ठिकाणी तीन ते चार वेळा हलविण्यात आले. परिणामी जुन्या फाईली, कागदपत्रे अस्तावस्त्य होती. त्यांची आता व्यवस्थीत रचना होणार आहे.