जि.प.च्या निवडणुका लांबणीवर पडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:50 PM2018-12-01T12:50:29+5:302018-12-01T12:50:41+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद अधिनियम दुरुस्तीचे विधेयक या विधानसभा अधिवेशनात चर्चेत आलेच नसल्याने ...
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद अधिनियम दुरुस्तीचे विधेयक या विधानसभा अधिवेशनात चर्चेत आलेच नसल्याने जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया रेंगाळणार आहे. त्यामुळे राज्यातील नंदुरबार, धुळेसह चारही जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणा:या 23 पंचायत समितींच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. परिणामी याठिकाणी प्रशासक नियुक्तीची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील नंदुरबार, धुळे, अकोला व वाशीम या चार जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत येणा:या 23 पंचायत समितींची निवडणुकीची मुदत येत्या 30 डिसेंबरला पूर्ण होत आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महिनाभरापूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. तथापि, गट-गणांच्या आरक्षणाच्या मुद्यावरून काही याचिकाकर्ते न्यायालयात गेल्याने न्यायालयाने या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. शिवाय आरक्षणाच्या मुद्यावर राज्य शासनाकडून उत्तर मागवले आहे. त्यासाठी राज्य शासनाला जि.प. अधिनियमात दुरुस्ती करावी लागणार असून त्याकरिता विधानसभा अधिवेशनात हे दुरुस्ती विधेयक मंजूर करावे लागणार आहे. वास्तविक निवडणुकीची मुदत महिनाभरात संपणार असल्याने या हिवाळी अधिवेशात पहिल्याच आठवडय़ात या विधेयकावर चर्चा अपेक्षित होती. परंतु ती झालीच नाही. यावरून राज्य शासनाचा मूढ निवडणुकांबाबत काहीसा सावध असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, विधेयक चर्चेत न आल्याने आता महिनाभरात सर्व प्रक्रिया होणे अवघड आहे. दुसरा मार्ग याबाबत राज्य शासन मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन अध्यादेश काढू शकते. परंतु हा अध्यादेश निघाला तरी न्यायालयात तो सादर करणे, त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे तो पाठवणे, पुन्हा नव्याने निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू होणे या सर्व बाबींसाठी विलंब लागणार असल्याचे स्पष्ट असल्याने आता 30 डिसेंबरपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होणे अशक्य आहे. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट असल्याने मुदत संपल्यानंतर राज्य शासन या जिल्हा परिषद व पंचायत समितींवर प्रशासक नेमते की त्यांना मुदतवाढ देते याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीची मुदत संपणा:या जि.प. व एकूण जागा
4नंदुरबार एकूण जागा 55
4धुळे एकूण जागा 56
4अकोला एकूण जागा 56
4वाशीम एकूण जागा 52
पंचायत समित्या
नंदुरबार- एकूण पंचायत समिती 6, जागा- 110
धुळे- एकूण पंचायत समिती 4, जागा- 112
अकोला- एकूण पंचायत समिती 7, जागा- 106
वाशीम- एकूण पंचायत समिती 6, जागा- 104