ंंमहापौरपदासाठी ११, तर उपमहापौरपदासाठी दहा जणांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:58 AM2019-11-21T00:58:18+5:302019-11-21T00:58:40+5:30

महापालिकेच्या सोळाव्या महापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) अकरा अर्ज, तर उपमहापौरपदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांनी पदाधिकाऱ्यांसमवेत अर्ज दाखल केले आहेत.

 1 application for the post of mayor and ten for the post of deputy mayor | ंंमहापौरपदासाठी ११, तर उपमहापौरपदासाठी दहा जणांचे अर्ज

ंंमहापौरपदासाठी ११, तर उपमहापौरपदासाठी दहा जणांचे अर्ज

Next

नाशिक : महापालिकेच्या सोळाव्या महापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) अकरा अर्ज, तर उपमहापौरपदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांनी पदाधिकाऱ्यांसमवेत अर्ज दाखल केले आहेत. भाजप आणि सेनेच्या इच्छुकांबरोबरच कॉँग्रेस आणि राष्टवादीच्या इच्छुकांनीदेखील अर्ज केले असून, तडजोडीत कोणाच्या हाती काय पडते याकडे लक्ष लागून आहे.
महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि.२२) होत असून, त्यासाठी बुधवारी (दि.२०) दुपारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. सकाळपासूनच प्रमुख पक्षांचे नेते आणि उमेदवार महापालिकेच्या राजीव गांधी भवनात दाखले झाले होते. पक्षाचे निर्णय जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महापौरपदासाठी भाजपच्या पाच तसेच शिवसेनेच्या चार उमेदवारांखेरीज कॉँग्रेसच्या वतीने राहुल दिवे यांनी आणि भाजपचे बंडखोर कमलेश बोडके यांनी अर्ज दाखल केला.
उपमहापौरपदासाठी भाजपने शिफारस केलेल्या चार संभाव्य उमेदवारांखेरीज भाजप बंडखोर कमलेश बोडके आणि सुनीता पिंगळे यांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या वतीने विलास शिंदे यांनी अर्ज दाखल केला, तर कॉँग्रेसच्या वतीने शाहू खैरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. हेमलता पाटील यांनी अर्ज दाखल केला. राष्टÑवादीच्या वतीने जीन सुफीयान यांनीच एकमेव अर्ज दाखल केला.
मनसेचा एकही अर्ज दाखल नाही
महापालिकेतील विविध पक्षांपैकी केवळ मनसेच्या वतीने एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. माजी गटनेता सलीम शेख यांनी उमेदवारी अर्ज नेला असला तरी तो दाखल मात्र केला नाही. मनसेचे सर्व म्हणजे पाच नगरसेवक मुंबईत होते.

Web Title:  1 application for the post of mayor and ten for the post of deputy mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.