सतरा गावांतील आदिवासी वस्त्यांत ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत १ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:18+5:302021-07-31T04:15:18+5:30
ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सिन्नर विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतींनी विकास कामांचे प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यालयात सादर ...
ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सिन्नर विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतींनी विकास कामांचे प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यालयात सादर केले होते. ग्रामपंचायतींच्या या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी आमदार कोकाटे यांनी शिफारस केल्याने विधानसभा मतदार संघातील १७ गावांमध्ये १ कोटी २८ लाख ९२ हजार रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. संबंधित गावातील आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
पांगारवाडी, कुंदेवाडी व वडांगळी येथे ७ लाख ५० हजार रुपयांतून पाणी टाकी व पाइपलाइन कामे होणार आहेत. जोगलटेंभी येथे पाणी टाकीसाठी ७ लाख ४९हजार, तर हरसुले येथे पाणीपुरवठा योजनेसाठी ७ लाख ४९हजार, वडगाव सिन्नर येथे १२ लाख ४९ हजार,शास्त्रीनगर २ लाख ५० हजार रुपये मंजूर झाले आहेत. शुद्ध पाण्याचे संयंत्र बसविण्यासाठी भाटवाडी ३ लाख ९५ हजार, कोमलवाडी, विंचूर दळवी, मापारवाडी, शहा या गावांना प्रत्येकी ७ लाख ५९ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे आदिवासी बांधवांनाही मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, त्यामुळे त्यांची प्रकृतीही उत्तम राहण्यास मदत मिळणार आहे.
वडगाव सिन्नर, ढोमाची वाडी, धुळवड, चापडगाव येथे प्रत्येकी १५ लाख रुपयातून मंगल कार्यालय बांधकाम होणार आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांची लग्न व इतर कार्यक्रमांची मोठी सोय होणार आहे. त्यातून त्यांची होणारी आर्थिक ओढाताणही थांबणार आहे. देशवंडी व दहिवाडी येथे प्रत्येकी सात लाख ५० हजार रुपयांचे सभा मंडप कामे मंजूर झाली आहेत.