कारखान्यातून १ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:13 AM2021-03-28T04:13:56+5:302021-03-28T04:13:56+5:30
---------------------- विवाहितेचा छळ; पतीसह सातजणांविरुद्ध गुन्हा मालेगाव : वाहन घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, म्हणून शारीरिक व मानसिक ...
----------------------
विवाहितेचा छळ; पतीसह सातजणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : वाहन घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, म्हणून शारीरिक व मानसिक छळ करणार्या पतीसह सातजणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सारिका किरण जाधव या विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती किरण मधुकर जाधव व इतर सातजण (रा. वावी वेस, ता. सिन्नर) यांनी चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याचे सारिका यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार आहेर करत आहेत.
-----------------
विवाहितेचा छळ, चौघांविरूद्ध गुन्हा दाखल
मालेगाव : चारित्र्याचा संशय घेऊन तसेच माहेरहून वीस लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह चारजणांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फरहादीबा काजी रईसउद्दीन या विवाहितेने फिर्याद दिली आहे. काजीर रईसउद्दीन बशीरुद्दीन, बशीररुद्दीन बद्दरुद्दीन, सलमा बशीरुद्दीन, शाहिना बशीरुद्दीन यांनी छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
-------------------
लोखंडी गजने मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील कंधाने येथे एकाला लोखंडी गजने गंभीर स्वरूपाची मारहाण करणाऱ्या विलास उर्फ बाळू सुभाष गावडे याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धनराज पोपट पवार यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांना ‘तुझा भाऊ पोलिसात तक्रार का देतो’ अशी कुरापत काढून गावडे याने लाथाबुक्क्याने व लोखंडी गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील करत आहेत.
----------------
बेशुद्धावस्थेतील वृद्धाचा मृत्यू
मालेगाव : शहरातील हॉटेल मीनादजवळ बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या अनोळखी वृद्धाला पोलिसांनी उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या वृद्धाच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट व हातावर गोंदलेले आहे. संबंधित मृताच्या नातेवाईकांनी शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन व्ही. ओ. वसावे यांनी केले आहे.