नाशिक विभागातील 1 लाख 70 हजार विद्यार्थ्यांच्या कलचाचणीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:25 PM2019-12-27T15:25:31+5:302019-12-27T15:27:31+5:30

करिअरमधील महत्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या वर्गाकडे पाहिले जाते. अशा दहावीतील  विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत जाण्याचा कल आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे   घेण्यात येणाऱ्या  कलमापन व अभिक्षमता चाचणीस शुक्रवार (दि.२७) सुरुवात झाली आहे. 

1 lakh 70 thousand students of Nashik region started the trend | नाशिक विभागातील 1 लाख 70 हजार विद्यार्थ्यांच्या कलचाचणीस सुरुवात

नाशिक विभागातील 1 लाख 70 हजार विद्यार्थ्यांच्या कलचाचणीस सुरुवात

Next
ठळक मुद्देकलचाचणी परीक्षेस शुक्रवारपासून सुरुवात विभागातील दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची कलचचणी

नाशिक : करिअरमधील महत्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या वर्गाकडे पाहिले जाते. अशा दहावीतील  विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत जाण्याचा कल आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे   घेण्यात येणाऱ्या  कलमापन व अभिक्षमता चाचणीस शुक्रवार (दि.२७) सुरुवात झाली असून महाकरिअर मित्र अ‍ॅपद्वारे ऑनलाईन घेतली जाणारी ही  चाचणी १८ जानेवारी २०२० पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष के.बी.पाटील यांनी दिली आहे. 
कलचाचणी मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यासाठी ‘महाकरिअर मित्र’ अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कंप्यूटरवरही ही चाचणी देता येणार आहे.  चाचणीपरीक्षेसाठी गुगल प्लेस्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले असले तरी ज्या विद्यार्थ्यांना मोबाइल अ‍ॅपद्वारे कलचाचणी देता येणार नाही, त्याच्यासाठी संगणकाद्वारे ही चाचणी देता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  फेब्रुवारी व मार्च २०२० मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या असून नाशिक जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७० हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ होण्याशी शक्यता आहे. या परीक्षांच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी  कल चाचणीची मदत होते. यात कलचाचणीद्वारे कृषी, कला व मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक आदी क्षेत्रांकडे विद्यार्थ्यांचा असलेला कल जाणून घेतला जातो तर अभिक्षमचा चाचणीद्वारे भाषिक, तार्किक, अवकाशीय, सांख्यिकीय अशा चार क्षमतांची चाचणी घेण्यात येणार असल्याचे विभाग समन्वयक डॉ. बाबासाहेब बडे यांनी सांगितले. 

Web Title: 1 lakh 70 thousand students of Nashik region started the trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.