१ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना मिळाला पीकविम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:43 AM2020-07-27T00:43:24+5:302020-07-27T00:44:44+5:30

नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या होणाºया नुकसानीला संरक्षण मिळावे यासाठी पिकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्णात एकूण एक लाख ९८ हजार ५१२ शेतकºयांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी १ लाख ८८ हजार ७७२ शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

1 lakh 88 thousand farmers got the benefit of crop insurance | १ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना मिळाला पीकविम्याचा लाभ

१ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना मिळाला पीकविम्याचा लाभ

Next
ठळक मुद्देवाढता कल : यावर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा

नाशिक : नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या होणाºया नुकसानीला संरक्षण मिळावे यासाठी पिकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्णात एकूण एक लाख ९८ हजार ५१२ शेतकºयांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी १ लाख ८८ हजार ७७२ शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
अतिवृष्टीसह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत असतो. यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा व हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. सुरुवातीच्या काळात पीकविम्याकडे शेतकरी गांर्भीयाने लक्ष देत नसल्याने या योजनांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. याबाबत शासनस्तरावरून जनजागृती केली गेल्याने सध्या पीकविम्याकडे शेतकºयांचा कल वाढू लागला
आहे. यावर्षी पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९ हजार ८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. पीकविम्याअंतर्गत ८० हजार ६६७ हेक्टर, तर फळपिकाचे सात हजार ६२९ हेक्टर इतके क्षेत्र संरक्षित झाले आहे. पीकविमा घेणाºयांमध्ये मालेगाव तालुक्यातील शेतकºयांची संख्या (३६,००४) सर्वाधिक आहे, तर सटाणा तालुक्यात २४ हजार ९८९ शेतकºयांनी पीकविमा घेतला आहे.
सन २०१९-२०च्या खरीप हंगामात जिल्ह्णात एकूण १ लाख ९८ हजार ५१२ शेतकºयांनी पीकविमा घेतला होता. त्याअंतर्गत १ लाख ३१ हजार ६६९ हेक्टर क्षेत्रावरील पीक संरक्षित झाले होते. या पोटी ९ कोटी ६६ लाख रुपये शेतकरी हिस्सा होता. गतवर्षी १ लाख ८८ हजार ७७२ शेतकºयांना पीकविम्यापोटी १८३ कोटी ९० लाख रुपयांचा लाभ देण्यात आला होता.
तालुकानिहाय शेतकºयांची संख्या
मालेगाव - ३६००५, सटाणा-२४९८९, नांदगाव - १६२३७ , कळवण - ३७८१, देवळा - ११२१५, दिंडोरी - ९८१, सुरगाणा - ४३९, नाशिक - १९४, त्र्यंबकेश्वर - १८५६, इगतपुरी - ३६०८,
पेठ - ६२३४, निफाड -४०७७, सिन्नर - ११५३८ , येवला - ४९४३,
चांदवड - ५९६८.

Web Title: 1 lakh 88 thousand farmers got the benefit of crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.