२३ जण नाशिकला हलवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:39 PM2020-04-14T23:39:47+5:302020-04-15T00:00:25+5:30

तालुक्याच्या पूर्व भागात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. या रुग्णाचे वास्तव्य असलेल्या गावासह लगतच्या तीन गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम आरोग्य विभाग व आशा कार्यकर्त्यांनी पूर्ण करण्यासह गाव व परिसर निर्जंतुक करण्यात आला. रुग्णाच्या संपर्कातील २३ जणांना सोमवारी रात्रीच नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.

1 moved to Nashik | २३ जण नाशिकला हलवले

सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

Next
ठळक मुद्देकोरोनाबाधिताशी संपर्क : सिन्नर तालुक्यातील गावात युद्धपातळीवर सर्वेक्षण; संपूर्ण परिसर केला निर्जंतुकीकरण

सिन्नर/पाथरे : तालुक्याच्या पूर्व भागात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. या रुग्णाचे वास्तव्य असलेल्या गावासह लगतच्या तीन गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम आरोग्य विभाग व आशा कार्यकर्त्यांनी पूर्ण करण्यासह गाव व परिसर निर्जंतुक करण्यात आला. रुग्णाच्या संपर्कातील २३ जणांना सोमवारी रात्रीच नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
पाथरे खुर्द व बुद्रुक, वारेगाव, कोळगाव माळ या चार गावांच्या सीमा जिल्हा प्रशासनाने सील केल्या असून, ही सर्व गावे आरोग्य यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आली आहेत. सर्दी खोकला, तापाचे लक्षण असणाऱ्यांचे व्यक्तींचे वर्गीकरण करून त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी आशा, अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे काम मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने ३० पथके तैनात केली असून, आरोग्य सेवक, वावी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचे या पथकांवर नियंत्रण असणार आहे.
प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव पाथरे येथील सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर लक्ष ठेवून आहेत. या कुटुंब सर्वेक्षणात घरी येणाºया आरोग्य सेवकांना घरातील सदस्यांची माहिती देण्यात यावी. गेल्या महिनाभराच्या काळात बाहेरून आलेल्या सदस्यांबद्दल सांगावे. तसेच घरातील कोणाला सर्दी, तापाची लक्षणे जाणवल्यास ग्रामपंचायत कार्यालयात किंवा सर्वेक्षणासाठी येणाºया पथकांना कळवावे, असे आवाहन डॉ. बच्छाव यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने चारही गावांमध्ये संचारबंदी कठोरपणे राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गावातील वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अन्यथा संचारबंदी उल्लंघनाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा तहसीलदार कोताडे यांनी दिला आहे.

प्रतिबंधक साहित्याची मदत
सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे, त्या भागात काम करणाºया प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत समिती सदस्य योगिता बाबासाहेब कांदळकर यांच्या वतीने सुमारे १८ हजार रुपयांचे प्रतिबंधात्मक साहित्य देण्यात आले. मास्क, सॅनिटायझर व औषधे असे साहित्य तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत वैद्य यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी बाबासाहेब कांदळकर, वावीचे उपसरपंच सतीश भुतडा उपस्थित होते.

दर पाच दिवसांनी पाथरे गावाचे निर्जंतुकीकरण
पाथरे गाव शंभर टक्के ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे ठरले आहे. पाथरे खुर्द, वारेगाव, पाथरे बुद्रुक गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. दर पाच दिवसांनी गाव निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र पाच दिवस बंद ठेवण्याचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाने दिले आहे.

आठवडे बाजार बंद
ग्रामपंचायतने येथील कॉर्पोरेशन बँक चौदा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी गर्दी होते असे ठिकाणे सक्तीने बंद करण्यात आले आहे. आठवडे बाजार पुढील आदेश येइपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉर्पोरेशन बँकच्या ग्राहकांनी सहकार्य करावे तसेच पुन्हा बँक सुरू झाल्यावर सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 1 moved to Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.