शिष्यवृत्तीसाठी १५ पर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:50 AM2019-11-12T00:50:50+5:302019-11-12T00:51:18+5:30
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत असून, महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
नाशिक : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत असून, महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि.१५) पर्यंत नियमित शुल्कासह तर विलंब शुल्कासह अर्ज करण्यास १६ ते ३० नोव्हेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे.
महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२० मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, याबाबत परिषदेच्या संकेतस्थळावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार नियमित शुल्कासह पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेकरीता शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व आॅनलाइन शुल्क भरण्यासाठी १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्यास १६ ते ३० नोव्हेंबरपर्यंत संधी आहे. अतिबिलंब शुल्कासह १ ते १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. तर अतिविशेष विलंब शुल्क भरून १६ ते ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. मात्र, ३१ डिसेंबर २०१९ नंतर कोणत्याही परिस्थितीत आॅनलाइन अथवा आॅफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार नाही.