जिल्ह्यात दिवसभरात आढळले १ हजार ४१९ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 02:05 AM2020-09-10T02:05:34+5:302020-09-10T02:07:05+5:30

नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. बुधवारी (दि.९) दिवसभरात १ हजार ४१९ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ७४४ इतकी झाली आहे. मंगळवारी २० तर बुधवारी १८ रुग्ण दगावल्याने बळींचा एकूण आकडा ९९१वर पोहोचला आहे.

1 thousand 419 corona affected were found in the district during the day | जिल्ह्यात दिवसभरात आढळले १ हजार ४१९ कोरोनाबाधित

जिल्ह्यात दिवसभरात आढळले १ हजार ४१९ कोरोनाबाधित

googlenewsNext

नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. बुधवारी (दि.९) दिवसभरात १ हजार ४१९ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ७४४ इतकी झाली आहे. मंगळवारी २० तर बुधवारी १८ रुग्ण दगावल्याने बळींचा एकूण आकडा ९९१वर पोहोचला आहे. दिवसभरात ५६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मृतात शहरातील नऊ, ग्रामीणचे आठ तर मालेगावातील एका रुग्णाचा समावेश आहे.
बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ४५३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार १७७ रु ग्ण शहरातील आहेत.
नाशिकच्या बाधितांची एकूण संख्या ३२ हजार ८९३ झाली आहे, ग्रामीणचा आकडा ११ हजार ६२८ इतका झाला आहे. शहरात आतापर्यंत २६ हजार ८८६, तर ग्रामीणमध्ये ८ हजार २८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मालेगाव मनपा हद्दीत रुग्णसंख्या २ हजार ९७७ इतकी असून, त्यापैकी २ हजार २६३ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी शहरात एकूण ९७२, ग्रामीणमध्ये ४१३ तर मालेगावात ३४ रुग्ण आढळले. जिल्ह्यात ३७ हजार ६३९ रुग्ण बरे झाले आहेत.














, तर ९ हजार ११४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. १ हजार ९५० रुग्णांचे चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

Web Title: 1 thousand 419 corona affected were found in the district during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.