जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ४८६ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:35 AM2020-09-09T01:35:39+5:302020-09-09T01:36:38+5:30

जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. मंगळवारी (दि.८) रुग्णसंख्येचा आलेख अधिकच उंचावला. दिवसभरात १ हजार ४८६ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४६ हजार ३२५ इतकी झाली आहे. मंगळवारीही दिवसभरात २० रु ग्णांचा मृत्यू झाला. १ हजार ८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

1 thousand 486 corona affected during the day in the district | जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ४८६ कोरोनाबाधित

जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ४८६ कोरोनाबाधित

Next

नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. मंगळवारी (दि.८) रुग्णसंख्येचा आलेख अधिकच उंचावला. दिवसभरात १ हजार ४८६ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४६ हजार ३२५ इतकी झाली आहे. मंगळवारीही दिवसभरात २० रु ग्णांचा मृत्यू झाला. १ हजार ८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील १०, ग्रामीणमधील ७ तर मालेगावातील तिघा जणांचा समावेश आहे. मृतांचा आकडा आता ९७३वर पोहोचला आहे.
नाशिक जिल्ह्यात १ हजार २९७ संशयित रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार १७९ रु ग्ण शहरातील आहेत. शहराची बाधितांची एकूण संख्या ३१ हजार ९२१ झाली आहे, तर ग्रामीणचा आकडा ११ हजार २१५ इतका झाला आहे. शहरात आतापर्यंत २६ हजार ६५६ रुग्ण, तर ग्रामीणमध्ये ८ हजार १८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मालेगाव मनपा हद्दीतील रुग्णांची एकूण संख्या २ हजार ९४३ झाली असून, त्यापैकी २ हजार १९६ रुग्ण बरे झाले आहेत.







मंगळवारी शहरात एकूण ३१०, ग्रामीणमध्ये १ हजार १३४, तर मालेगावात ४० नवे रुग्ण आढळले. ग्रामीण भागात रविवारपासून रुग्णसंख्या साडेतीनशेपर्यंत पोहचली असताना मंगळवारी ती एक हजाराच्या पुढे गेली. जिल्ह्णात आतापर्यंत ३७ हजार ७७ रुग्ण बरे झाले आहेत, तर ८ हजार २७५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. २ हजार ११८ रुग्णांचे चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: 1 thousand 486 corona affected during the day in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.