जिल्ह्यात २४ तासांत पुन्हा १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 08:20 PM2020-09-12T20:20:07+5:302020-09-12T20:22:54+5:30

जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५३ हजार ३२९ इतका झाला आहे.

1 thousand 569 new corona affected in 24 hours in the district | जिल्ह्यात २४ तासांत पुन्हा १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित

जिल्ह्यात २४ तासांत पुन्हा १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक शहरात १ हजार ५० रुग्ण१ हजार ९३३ नमुना चाचणी अहवाल प्रलंबित

नाशिक : शहरासह ग्रामिण भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे थैमान सुरु आहे. मागील ४८ तासांत ३ हजार १३८ रुग्ण जिल्ह्यात वाढले तर शनिवारी (दि.१२) दिवसभरात १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. शुक्रवारीदेखील १ हजार ५५१ रुग्ण मिळून आले होते. शनिवारी उपचारार्थ दाखल १५ रुग्ण दगावल्याने आता मृतांचा आकडा १ हजार ५०इतका झाला आहे. तसेच १ हजार ६६ रुग्ण २४ तासांत बरे झाले आहेत.
कोरोनाग्रस्तांचा आकडा अधिकच उंचावत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २९ रुग्ण उपचारादरम्यान दगावले होते. त्यानंतर सलग दोन दिवसांत ३० रुग्ण मृत्युमूखी पडले. जिल्ह्यात दररोज दीड हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने आता प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. मागील आठवडाभरापासून शहरापाठोपाठ जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शनिवारी नाशिक शहरात १ हजार ५०, ग्रामिणमध्ये ४४६ तर मालेगावात ७२ नवे कोरोनाचे रुग्ण मिळाले. यामुळे आता जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५३ हजार ३२९ इतका झाला आहे. यामध्ये शहरात ३५ हजार ९७४, ग्रामीणमध्ये १२ हजार ९८०, मालेगावात ३ हजार १२४ आणि जिल्ह्याबाहेरील २५१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार ८६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १० हजार ४१५ रुग्ण सध्या उपचार घेत असून आतापर्यंत १लाख ३३ हजार ८४८ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. एकूण १ हजार ९३३ रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. शनिवारी शहरात ५ तर ग्रामिणमध्ये ९ रुग्ण आणि जिल्हाबाहेरील १ अशा १५ रुग्णांंचा मृत्यू झाला. दिवसभरात जिल्ह्यात २ हजार ५८ संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Web Title: 1 thousand 569 new corona affected in 24 hours in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.