९६ ग्रामपंचायतींसाठी १ हजार ६८४ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:24+5:302021-01-08T04:41:24+5:30
मालेगाव : ९९ पैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ९६ ग्रामपंचायतींसाठी १ हजार ६८४ जण रिंगणात उतरले आहेत, तर ८०८ ...
मालेगाव : ९९ पैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ९६ ग्रामपंचायतींसाठी १ हजार ६८४ जण रिंगणात उतरले आहेत, तर ८०८ जणांनी माघार घेतली आहे. २०८ जण बिनविरोध निवडून आले आहेत. तालुक्यातील चोंढी, लखाणे, ज्वार्डी बु. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या ९६९ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. सोमवारी माघारीनंतर गावागावातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील गावांची नावे माघारीनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवार संख्या, कंसात माघार घेणाऱ्या उमेदवारांची संख्या अशी - राजमाने ६ (५), घाणेगाव १९ (६), चंदनपुरी २७ (१२), येसगाव २८ (९), डाेंगराळे १७ (१५), लेंडाणे १७ (४), दसाणे १८ (१२), अजंग ३८ (२१), वऱ्हाणे १७ (१४), वनपट ४ (७), सोनज १४ (११), कौळाणे २२ (२४), पिंपळगाव २१ (२), चिंचावड १२ (३), गुगुळवाड १४ (३), गारेगाव १९ (९), झाडी १८ (६), खायदे २३ (१), खाकुर्डी १७ (१), नांदगाव २६ (२०), टाकळी १२ (२), कोठरे बु. १२ (२), कळवाडी २२ (१२), वडेल ३२ (९), कुकाणे १९ (६), नरडाणे १७ (२), उंबरदे १४ (४), पांढरून ६ (२), मथुरपाडे ८ (२), रावळगाव ३६ (१९), शेरूळ १९ (१२), चोंढी (बिनविरोध), येसगाव खु. १८ (६), एरंडगाव १९ (४), डाबली १९ (७), लोणवाडे १६ (१०), चिखलओहोळ २१ (६), विराणे २० (०), भिलकोट १९ (१५), निमगाव खु. १२ (७), गिलाणे ४ (२), दहिदी २६ (१५), ढवळेश्वर २५ (११), अजंदे २२ (२), अस्ताणे १५ (२३), आघार खु।। २४ (६), जेऊर १६ (१४), जळकू ९ (१०), जळगाव (निं.) २६ (१६), वडगाव २७ (३), वळवाडे १८ (५), वळवाडी ६ (६), हाताणे १९ (८), सायने १४ (०), टिंगरी १९ (८), टेहरे १४ (२१), मेहुणे २३ (७), पाडळदे २१ (१९), मुंगसे २२ (२), माणके ८ (२), मळगाव २२ (५), रोंझाणे ९ (२), शेंदुर्णी १४ (८), घोडेगाव १८ (२०), हिसवाळ २ (२), निमगुले ११ (५), निमगाव ३२ (४), देवघट २१ (६), देवारपाडे १७ (४), दहिवाळ १८ (७), आघार बु. १८ (१८), वाके १० (४), सवंदगाव २२ (१२), चिंचवे गा. ६ (८), खडकी २२ (९), खलाणे १३ (५), गिगाव १२ (४), कजवाडे २७ (६), तळवाडे ३७ (१५), ज्वार्डी (बिनविरोध), जळगाव (गा.) २५ (११), झोडगे ३४ (४७), लखाणे (बिनविरोध), सिताणे ११ (०), निमशेवडी ८ (४), दापुरे (१२ (२), भारदेनगर ११ (१), सावकारवाडी ८ (२४), साकुर १६ (८), साकुरी निं. १५ (४), गरबड ८ (१), चिंचगव्हाण २० (१), नाळे १४ (४), कंधाणे १९ (१९), कौळाणे गा. १२ (१२), साजवहाळ ११ (६), नागझरी १२ (१), गाळणे १६ (७), पाथर्डे १४ (२) माघारीनंतर गावागावांतील चित्र स्पष्ट झाले आहे.