कळवणमध्ये आढळले १० बाधित; आजपासून जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 10:06 PM2020-07-16T22:06:39+5:302020-07-17T00:02:18+5:30
कळवण : शहरात कोरोनाचे दहा बाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उद्या दि. १७ ते २२ जुलैपर्यंत सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. कळवण व्यापारी असोसिएशनने याबाबत पुढाकार घेऊन अत्यावश्यक सेवा-वगळता सर्व व्यवसाय, व्यवहार बंद ठेवण्याचे निश्चित करण्यात आले.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी व व्यापारी बांधवांची बैठक घेण्यात आली. शहरातील नागरिक वा व्यापारी बांधवांनी निर्देशांचे पालन करून जनता कर्फ्यूू पाळण्याचे आवाहन आमदार पवार यांनी बैठकीत केले.
यावेळी देवीदास पवार, कारभारी आहेर, महेंद्र हिरे, राजेंद्र भामरे, अंबादास जाधव, तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, भूषण पगार, सुनील महाजन, मोहनलाल संचेती, विलास शिरोरे, नितीन वालखडे, जयंत देवघरे, संदीप पगार, सागर खैरनार, उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.
४ कळवण शहरात १० बाधित रु ग्ण आढळून आल्यानंतर वाढत चाललेल्या रु ग्णसंख्येने कळवणकरांमध्येही शंकेची पाल चुकचुकत आहे. कोरोना कळवण शहरात येऊन धडकल्याने शहरवासीय खडबडून जागे झाले असून,. विशेष खबरदारी घेत होते. प्रशासनही सज्ज होऊन आवश्यक उपाययोजना करीत होते.
४दरम्यान, कळवण शहरातील गांधी चौक व परिसरात वास्तव्यास असलेल्या १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाल्यामुळे शहरात भीती व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने घोषित केलेल्या कर्फ्यूत मेडिकल, रुग्णालये वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.