येवल्याजवळ क्रूझरचे टायर फुटून १० जणांचा मृत्यू; साखरपुड्याहून परतताना काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:15 AM2017-08-28T01:15:56+5:302017-08-28T01:16:01+5:30

10 killed in crossing the cruiser's tire near Yeola; The time of returning from sugarcane will be of the time | येवल्याजवळ क्रूझरचे टायर फुटून १० जणांचा मृत्यू; साखरपुड्याहून परतताना काळाचा घाला

येवल्याजवळ क्रूझरचे टायर फुटून १० जणांचा मृत्यू; साखरपुड्याहून परतताना काळाचा घाला

Next

येवला : कोळपेवाडी येथे साखरपुडा आटोपून धुळे येथे परतत असताना क्रूझरचे टायर फुटून ती मारुती ओम्नी व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जण ठार झाले असून, पंधराहून अधिक लोक जखमी आहेत. येवला-मनमाड रस्त्यावर बाभूळगाव शिवारात रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा अपघात झाला. याचवेळी पल्सर मोटारसायकल एसटीवर आदळून अन्य एक अपघात झाल्याने एकाच ठिकाणी चार वाहनांचा अपघात झाला. अपघातातील गंभीर जखमींची संख्या अधिक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
या चार वाहनांच्या अपघातस्थळाचे दृश्य भयानक होते. अपघातस्थळी रक्तामांसाचा सडा पडला होता. तसेच मृतांचे अवयव सर्वत्र विखुरले होते. एसटी बसचे किरकोळ नुकसान झाले. क्रूझर तसेच ओम्नी गाडीतील मृतदेह अखेर दरवाजा तोडून बाहेर काढले. वाहतूकदेखील सुमारे तासभर ठप्प झाली होती. दरम्यान, निजधाम व सावरगाव परिसरातील पवारांच्या गोतावळ्याने केलेल्या मदतीमुळे केवळ २० मिनिटात मदत कार्य करीत
अपघात ग्रस्तांना दवाखान्यात उपचारासाठी पाठवले. अपघातातील जखमींची संख्या जास्त असल्याने खाजगी डॉक्टर किशोर पहिलवान, डॉ. संजय जाधव, डॉ भूषण शिनकर, डॉ कुलकर्णी यांनी ग्रामीण उपजिल्हा रु ग्णालयामध्ये येऊन शासकीय वैद्यकीय अधिकाºयांना उपचारासाठी मदत केली. भारती राव, (धुळे), पियुष तिवारी, दिपा तिवारी, शिनू तिवारी रा. इटावा, उत्तरप्रदेश, लोटन चित्ते (धरणगाव जि.जळगाव), पवन जाधव (दोंडाईचा) या जखमींना येवला शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह टीमने जखमींना मदत कार्य करत वाहतूक सुरळीत केली.पोलीस उपाधीक्षक डॉ राहुल खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
अपघातातील मृतांची नावे
आदित्य बबन मरसाळे (१२), रा. फाशीपूल, अण्णा भाऊ साठेनगर , धुळे, यश महेश राव (१०) रा. सुरत ,(गुजरात), महेश दिलीप राव (४२), रा. फाशीपूल, अण्णा भाऊ साठेनगर, धुळे, ओम्नी चालक संजय हरी सोनवणे (३२) रा. अयोध्यानगर, मनमाड, निशांत मनोज तिवारी,(२३), रिटा अतुल तिवारी, (२६), शुभा तिवारी, लक्ष्मीकांत दीक्षित सर्व रा. इटावा, जि. बाकेनार, अन्य दोन मृतांची नावे समजू शकली नाही.
अपघातातील गंभीर जखमी
भारती महेश राव (सुरत), गुड्डी मरसाळे (जळगाव), स्वप्नील बाविस्कर (धुळे), योगेश रवींद्र मरसाळे (धुळे), भूषण संजय गांगुर्डे (धुळे), इंदूबाई चित्ते (धरणगाव, जळगाव), लताबाई प्रकाश गांगुर्डे (धुळे), वंश राजू गांगुर्डे (धुळे), मोहित राजू गांगुर्डे (धुळे), ज्योती राजू गांगुर्डे (धुळे), आदी मरसाळे (धुळे), पिंटू राव (सुरत), विजय प्रकाश गांगुर्डे (धुळे) आदी.
क्रूझर गाडीतील अपघातग्रस्त धुळे भागातील असून, ते कोळेपेवाडी येथून साखरपुड्याचा कार्यक्र म आटोपून धुळे येथे घरी परतत होते. क्रूझरमध्ये १५ ते १६ जण प्रवास करीत होते. ज्याचा साखरपुडा होता तो नवरामुलगा विजय गांगुर्डे रा. धुळे हा गाडीमध्ये जागा नसल्याने मित्राबरोबर मागून मोटारसायकलवर येत होता. त्यामुळे तो या अपघातातून बचावला.

Web Title: 10 killed in crossing the cruiser's tire near Yeola; The time of returning from sugarcane will be of the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.