कोविड सेंटरला दिले १० ऑक्सिजन सिलेंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 06:47 PM2021-04-25T18:47:37+5:302021-04-25T18:47:57+5:30
घोटी : इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला १० ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले. यामुळे कोरोना संकटाच्या काळात अनेक रुग्णांना त्याचा लाभ घेते येणे शक्य होणार आहे.
घोटी : इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला १० ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले. यामुळे कोरोना संकटाच्या काळात अनेक रुग्णांना त्याचा लाभ घेते येणे शक्य होणार आहे.
गेल्या आठवड्यात ग्रामीण रुग्णालय व कोरपगाव येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड वाढवावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिले होते. तेथील वैद्यकीय अधीक्षिकांनी ऑक्सिजन सिलेंडर नसल्यामुळे बेड वाढवता येत नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार मनसेचे डॉ. प्रदीप पवार व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांनी ग्रामीण रुग्णालयाला रविवारी (दि. २५) १० ऑक्सिजन सिलेंडर दिले. यावेळी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, मनसेचे तालुका अध्यक्ष मुलचंद भगत, उपतालुकाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, प्रताप जाखेरे, नीलेश जोशी, राज जावरे, सुमित बोधक, पूनम राखेचा, पिंटू चव्हाण, राजू राखेचा, अर्जुन कर्पे, नीलेश बुधवारे, धीरज गौड, शत्रुघ्न भागडे, दिलीप लहाने, समीर शेख, रवी भागडे, गौरव सोनवणे, नीलेश कराड, अविनाश कडू, एस. के. परीवार आदी उपस्थित होते.