येवल्यातील 10 अहवाल पॉझीटीव्ह; 9 कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 07:15 PM2020-09-30T19:15:01+5:302020-09-30T19:15:40+5:30
येवला : तालुक्यातील प्रतिक्षेतील 47 अहवालांत 14 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यात 4 बोहरील असून 10 अहवाल शहरासह तालुक्यातील आहेत. तर तालुक्यातील 9 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
येवला : तालुक्यातील प्रतिक्षेतील 47 अहवालांत 14 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यात 4 बोहरील असून 10 अहवाल शहरासह तालुक्यातील आहेत. तर तालुक्यातील 9 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
बाधितांमध्ये येवला संतोषी माता मंदिर येथील 23 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महिला, गोविंद नगर येथील 57 वर्षीय पुरूष, डीजीरोड येथील 48 वर्षीय महिला, 60 व 54 वर्षीय पुरूष, पाटीलवाडा येथील 44 वर्षीय महिला, तालुक्यतील अंदरसुल येथील 25 वर्षीय महिला, पारेगाव येथील 34 वर्षीय पुरूष, आडगाव रेपाळ येथील 43 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणेने बाधितांच्या संपर्कातील 14 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.
नाशिक रूग्णालयातून दोन, बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून चार तर नगरसुल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून तीन असे एकूण 9 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 764 झाली असून आजपर्यंत 643 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत 46 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (?क्टीव्ह) रूग्ण संख्या 75 असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.