पंचवटीमधील फुलेनगर परिसरात वीजतारांवर अडकलेली पतंग काढताना दहा वर्षांच्या चिमुरडा मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 08:31 PM2017-12-09T20:31:12+5:302017-12-09T20:34:26+5:30

सदर घटना परिसरातील रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर गुरूला त्वरित उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याला वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले.

A 10-year-old girl died in a fungus trapped on the electricity tank in Phule Nagar area of ​​Panchavati | पंचवटीमधील फुलेनगर परिसरात वीजतारांवर अडकलेली पतंग काढताना दहा वर्षांच्या चिमुरडा मृत्यूमुखी

पंचवटीमधील फुलेनगर परिसरात वीजतारांवर अडकलेली पतंग काढताना दहा वर्षांच्या चिमुरडा मृत्यूमुखी

googlenewsNext
ठळक मुद्देत्याची पतंग वीजतारांमध्ये जाऊन अडकली घराच्या छतावरील लोखंडी गज हातात घेऊन प्रयत्न सुरू केला गजाला वीजतारांचा स्पर्श होऊन वीजप्रवाहच्या धक्क्याने पत्र्यावर कोसळला.

नाशिक : परिसरातील फुलेनगर वसाहतीत राहणारे भोंड कुटुंबातील दहा वर्षाचा बालक शनिवारी (दि.९) संध्याकाळच्या सुमारास राहत्या पत्र्याच्या घरावरून पतंग उडवित होता. यावेळी पतंग घरावरील वीजतारांना अडकल्याने चिमुरड्याने पत्र्यावरील लोखंडी गजाच्या साहाय्याने पतंग काढण्याचा प्रयत्न केला असता वीजप्रवाह गजमध्ये उतरून बालक जागीच ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पेठरोडवरील फुलेनगरमधील कातारी गल्लीमधील गुरू किशोर भोंड (१०) हा चिमुरडा दुपारी राहत्या घराच्या छतावरून पतंग उडवित होता. यावेळी त्याची पतंग वीजतारांमध्ये जाऊन अडकली. सदर पतंग काढण्यासाठी गुरूने घराच्या छतावरील लोखंडी गज हातात घेऊन प्रयत्न सुरू केला असता गजाला वीजतारांचा स्पर्श होऊन वीजप्रवाहच्या धक्क्याने ते पत्र्यावर कोसळला.
सदर घटना परिसरातील रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर गुरूला त्वरित उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याला वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले.
फुलेनगर परिसरात उघडया विजतारा मोठया प्रमाणात आहेत. काही महिन्यांपुर्वी घराजवळ कपडे वाळत टाकतांना शॉक लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. झोपडपट्टी व गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणा-या या फुलेनगर भागातील अनेक घरांच्या छतांवर लोंबकळणाºया वीजतारांची जणू रहिवाशांवर टांगती तलवार आहे. त्यामुळे दुर्घटनांना निमंत्रण मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: A 10-year-old girl died in a fungus trapped on the electricity tank in Phule Nagar area of ​​Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.