मालेगावी १०० खाटांचे रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:02 AM2017-08-15T00:02:25+5:302017-08-15T00:18:13+5:30
मालेगाव : येथे ‘विशेष बाब’ म्हणून १०० खाटांचे महिला व मुलांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली असून, मालेगाव येथे १०० खाटांचे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे.

मालेगाव येथे सद्यस्थितीत २०० खाटांचे सामान्य रुग्णालय सुरू आहे. सदर रुग्णालय शहर, तालुक्यासह पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर महिला रुग्ण येत असतात. त्यामुळे शहर व तालुक्यातील महिलांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शहरात स्वतंत्र महिला रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता होती. सद्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे समवेत दि. १४ जानेवारी २०१५ तसेच दि. ९ मे २०१७ रोजी राज्यमंत्री भुसे यांनी महिला रूग्णालयाच्या संदर्भात बैठका घेतल्या होत्या. सदर महिला रूग्णालय तातडीने सुरू करण्यास मंजुरी मिळावी, अशी विनंती केली होती.