शंभर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:30 AM2017-09-23T00:30:30+5:302017-09-23T00:30:36+5:30
रोटरी क्लब आॅफ नाशिक व्हिजन नेक्स्टच्या वतीने नाशिकरोड परिसरात वर्षभरात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यापैकी १०० कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. हमरस्ते, चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येत असल्याने पोलीस प्रशासनाला कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठी मदत होत असून, नाशिकरोड परिसर ‘तिसºया डोळ्यात’ कैद होऊ लागला आहे.
नाशिकरोड : रोटरी क्लब आॅफ नाशिक व्हिजन नेक्स्टच्या वतीने नाशिकरोड परिसरात वर्षभरात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यापैकी १०० कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. हमरस्ते, चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येत असल्याने पोलीस प्रशासनाला कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठी मदत होत असून, नाशिकरोड परिसर ‘तिसºया डोळ्यात’ कैद होऊ लागला आहे. रोटरी क्लब आॅफ नाशिकरोड व्हिजन नेक्स्टचे अध्यक्ष कौसर आझाद यांनी जुलै महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर सामाजिक दृष्टीने इतर उपक्रम राबविण्याऐवजी नाशिकरोड परिसराला तिसºया डोळ्यात म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कैद करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाचे प्रकल्पप्रमुख दिनेश खंडारे, अतुल देशमुख, विनायक बेडीस आदी रोटरीच्या सदस्यांनी नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याशी संपर्क करून त्यांच्याकडून नाशिकरोड परिसरातील महत्त्वाचे हमरस्ते, व्यावसायिक संकुल, शाळा, महाविद्यालये, बॅँका, भाजीबाजार आदी ठिकाणांची, कॅमेºयांची गरज असलेले महत्त्वाचे ठिकाणे निश्चित केली.
रोटरी व्हिजन नेक्स्टने सीसीटीव्ही कॅमेरा, केबलिंग, डिव्हीआर, हार्डडिस्क, पॉवर सप्लाय आदींबाबत संबंधित कंपनी, विक्रेते व कॅमेरे बसविणाºया कारागिरांशी संपर्क साधून नाशिकरोड परिसराच्या सुरक्षितेच्या दृष्टीने राबविण्यात येणाºया सामाजिक उपक्रमाची माहिती दिल्यानंतर कॅमेरे देणाºया कंपनीनेदेखील या उपक्रमास हातभार लावण्यासाठी ३५ टक्के कमी किमतीने कॅमेरे उपलब्ध करून दिले. तसेच व्यापारी, बॅँका, डॉक्टर, वकील आदी दानशूरांनीदेखील आर्थिक मदतीसोबत आपल्याकडे कॅमेरा बसविण्यासाठी व इतर वस्तू ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. जवळपास वर्षभरात एक हजार कॅमेरे बसवण्यात येणार असून, त्याला तब्बल २५ ते ३० लाख रुपये खर्च येणार आहे.
बिटको चौक ते सत्कार पॉइंट, सोमाणी उद्यान रस्ता, गायकवाड मळा रोड, दत्त मंदिर सिग्नल ते मतिमंद शाळा, चेहेडी, सामनगाव रोड, शिखरेवाडी परिसर या भागात आतापर्यंत १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे नाशिकरोड व उपनगर पोलिसांना काही घटना, गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्हीच्या फुटेजची मोठी मदत झाली आहे. या उपक्रमामुळे नाशिकरोड परिसरातील कायदा-सुव्यवस्थेला मोठा हातभार लागत आहे.