तपोवनातून निघाली शंभर बुद्धमूर्तींची मिरवणूक; नाशिक जिल्ह्यातील १०० गावांमध्ये वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 04:10 PM2023-05-03T16:10:02+5:302023-05-03T16:10:32+5:30

नाशिकमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या १०० मूर्तींचा प्रदान सोहळा पार पडला. 

 100 idols of Lord Gautama Buddha were presented in Nashik  | तपोवनातून निघाली शंभर बुद्धमूर्तींची मिरवणूक; नाशिक जिल्ह्यातील १०० गावांमध्ये वाटप

तपोवनातून निघाली शंभर बुद्धमूर्तींची मिरवणूक; नाशिक जिल्ह्यातील १०० गावांमध्ये वाटप

googlenewsNext

नाशिक: भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्यावतीने जिल्ह्यात मंगळवारी भगवान गौतम बुद्ध यांच्या १०० मूर्तींचा प्रदान सोहळा पार पडला. यानिमित्ताने नाशिक शहरातून सायंकाळी मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील १०० गावांमधील ५०० श्रामनेर आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते. रात्री गोल्फ क्लब येथे महाबौद्ध धम्म परिषद, प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

सम्राट अशोक जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि भगवान बुद्ध जयंती तथा बुद्ध पौर्णिमा यानिमित्त दि. २३ एप्रिल ते २ मेदरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये श्रामनेर शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १०० गावांतील प्रत्येकी ५ उपासक श्रामणेर झाले असून, सुमारे ५०० श्रामणेरांचे प्रथमच अशा प्रकारे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यादरम्यान जिल्ह्यात विविध तालुक्यांमधील १०० गावांना भगवान बुद्ध यांच्या मूर्ती प्रदान करण्यात आल्या. नाशिक, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, सटाणा, कळवण, निफाड, देवळा आदी तालुक्यांचा समावेश आहे, अशी माहिती मोहन आढांगळे यांनी दिली. सायंकाळी ५ वाजता तपोवनातून भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात या मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर ही मिरवणूक जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएसमार्गे गोल्फ क्लब येथे आली. दरम्यान, ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. तसेच अनेक भीमगीते आणि बौद्धगीते यांनी परिसर व अनेक चौक दणाणून गेले होते.

या मिरवणुकीत भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, भदन्त बोधीपाल, भदन्त धम्मरत्न, भदन्त सुगत, भदन्त आर्यनाग, भदन्त शीलरत्न आदींसह पंचशील ध्वजाचे प्रतीक असलेल्या छत्री हाती घेऊन शेकडो श्रामणेर आणि पांढरे वस्त्र परिधान केलेले हजारो स्त्री- पुरुष, समाजबांधव सहभागी झाले होते. गोल्फ क्लब येथे मिरवणुकीचे रूपांतर श्रामणेर शिबिर तथा प्रबोधन सभेत झाले. यावेळी महा बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती, यात भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, भदन्त बोधीपाल, भदन्त धम्मरत्न, भदन्त सुगत, भदन्त आर्यनाग, भदन्त शीलरत्न आदींनी मार्गदर्शन केले, रात्री उशिरा या कार्यक्रमानंतर बौद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी प्रदीप पोळ, सचिन वाघ, राहुल बच्छाव, डी. एम. वाकळे, के. के. बच्छाव, वाय. डी. लोखंडे, संजय भरीत, आर. आर. जगताप, पी. डी. खरे, बाळासाहेब सिरसाट, आर. आर. जगताप, अरुण काशिद, नितीन मोरे, बबन काळे, आर. एस. भामरे, गुणवंत वाघ, संदेश पगारे, खुशाल जाधव, अशोक गांगुर्डे, सोमनाथ शार्दुल, शिवाजी काळे, अजिंक्य जाधव आदींसह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गावांना देण्यात आलेल्या १०० मूर्ती या प्रत्येकी साडेपाच फूट उंच असून, फायबर मेटलपासून एकाच साच्यात तयार करण्यात आल्या आहेत. रंगीबेरंगी फुलांनी व निळ्या झेंड्यांनी सजवलेल्या १०० रथांमधून या मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली.

 

Web Title:  100 idols of Lord Gautama Buddha were presented in Nashik 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक