100 क्ंिवटल तूर पडून

By admin | Published: March 10, 2017 01:13 AM2017-03-10T01:13:54+5:302017-03-10T01:14:06+5:30

येवला : बारदानाअभावी तूर खरेदी बंद करण्यात आल्याने तालुक्यातील चार गावांतील शेतकऱ्यांना सुमारे १०० क्विंटल तूर माघारी न्यावी लागली.

100 kiloliters from below | 100 क्ंिवटल तूर पडून

100 क्ंिवटल तूर पडून

Next

 येवला : बारदानाअभावी तूर खरेदी बंद करण्यात आल्याने तालुक्यातील चार गावांतील शेतकऱ्यांना सुमारे १०० क्विंटल तूर माघारी न्यावी लागली. शासन व नाफेडने बारदान त्वरित उपलब्ध करून द्यावे व तूर खरेदी पूर्ववत सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कडधान्यवाढीसाठी शासनाने विशेष योजना राबविल्याने तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. तुरीचा साठा करणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी कमी दरात तूर विक्री सुरू केली होती. परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या हेतूने शासनाने नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हमीभावाने तूर खरेदी केंद्र येवल्यात सुरू केले आहे. हे केंद्र सुरू होऊन महिना झाला.
नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्या वतीने येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ येथे ५०५० रुपये प्रति क्विंटल स्थिर भावाने ६ फेब्रुवारीला तूर खरेदी सुरू करून महिना झाला. गेल्या महिनाभरात ५०५० रु पये प्रतिक्विंटल दराने १७८५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.
भाव स्थिरता योजनेअंतर्गत तूर खरेदी करण्यास नाफेडद्वारा येवला तालुका खरेदी-विक्री संघाला पुरवलेले ३८०० किलो बारदानांपैकी ३५७० किलो बारदान महिनाभारत वापरला गेले. उरलेले बारदान फाटके असल्याने ते वापरता येत नाही. त्यामुळे बारदानाअभावी तूर खरेदी करणे शक्य नसल्याचे खरेदी- विक्री संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी सांगितले. तूर खरेदी पूर्ववत चालू व्हावी यासाठी नाफेडने बारदान त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: 100 kiloliters from below

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.