फ्रावशी अकॅडमीचा १०० टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:24 AM2018-05-31T00:24:53+5:302018-05-31T00:24:53+5:30

आर. एस. लथ एज्युकेशन ट्रस्ट संचलित फ्रावशी अकॅडमी ज्युनिअर कॉलेजने आपल्या यशाची घोडदौड कायम राखली आहे. यावर्षीही बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लागला आहे.

 100 percent result of fractal academy | फ्रावशी अकॅडमीचा १०० टक्के निकाल

फ्रावशी अकॅडमीचा १०० टक्के निकाल

Next

नाशिक : आर. एस. लथ एज्युकेशन ट्रस्ट संचलित फ्रावशी अकॅडमी ज्युनिअर कॉलेजने आपल्या यशाची घोडदौड कायम राखली आहे. यावर्षीही बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत कृष्णा चौहान हिने ९०.४६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक गिरिजा चौहान हिने ८९.५४ गुण प्राप्त केले, तर फरहीन मनिहार हिने ८५.५४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.  वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या उत्तरा पटेलला ८९.६९ टक्के गुण मिळाले. निशांत मोडक आणि ट्विंकल संघानी यांनी ८७.२३ टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक, तर भूमिशा लोडया हिने ८६.९२ टक्के गुणांनी तृतीय क्र मांक मिळविला.
डी. डी. बिटकोचा निकाल ९६ टक्के 
नाशिक : येथील डी. डी. बिटको कॉलेजचा बारावीचा निकाल ९६.४० टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेत ७७.८४ टक्के गुण मिळवत श्रीवस्ती देवरे प्रथम, ८५.७ टक्के गुण मिळवून कृष्णा वाघेरे कला शाखेत प्रथम, ७५.३८ टक्के गुण मिळवून वैभव जाधव वाणिज्य शाखेत प्रथम आला. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रेखा काळे, हेमंत बरकले, कांचन जोशी, शिक्षकवृंद आदींचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शिक्षक व पालक उपस्थित होते.
सुखदेव विद्यालयाचा  निकाल ८७ टक्के 
इंदिरानगर : सुखदेव माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावी विज्ञानचा निकाल यंदा १०० टक्के लागला. विज्ञान शाखेत एकूण ६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. कॉलेजचा सर्व शाखांमिळूनचा निकाल ८७.९४ टक्के लागला. विज्ञान शाखेत प्रणाली बडगुजर हिने ८५.५३ टक्के गुण मिळवून प्रथम क्र मांक पटकावला. भक्ती सजगुरे हिने ८४.७१ टक्के मिळवून द्वितीय, इशांत क्षत्रिय याने ८२.३० टक्के गुण मिळवत तृतीय क्र मांक मिळविला. कला शाखेत निमता बुरकुले हिने ७५.५३ टक्के गुण मिळवून प्रथम क्र मांक मिळविला. चांदणी पवार (७२.१५ टक्के) दुसरी, तर काजी राहिल व काजल बैरागी (६५.०७ टक्के) यांनी संयुक्त तृतीय क्र मांक पटकावला. वाणिज्य शाखेत प्रथम क्र मांक ऊर्मिला प्रजापती हिने ८२.०७ टक्के गुण मिळवून पटकावला. द्वितीय क्र मांक विपुल राठोड (७९.५३ टक्के) याने, तर निकिता बोरसे ७०.१५ टक्के गुण मिळवून तृतीय क्र मांकाने उत्तीर्ण झाली.

Web Title:  100 percent result of fractal academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.