नूतन त्र्यंबक विद्यालयाचा १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:12 AM2021-07-26T04:12:59+5:302021-07-26T04:12:59+5:30
शाळेतील २११ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील २१ विद्यार्थी विशेष श्रेणीत ...
शाळेतील २११ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील २१ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ११५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले, तर ७५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थ्यांत तुषार आत्मा गुरूम (प्रथम) ९३.४०, शुभम शरद कासार (द्वितीय) ८८.८०, अभिषेक मंगेश जाधव (तृतीय) ८७, किशोर पांडुरंग काशिकर (चतुर्थ) ८६.६०, तसेच प्रथमेश संतोष चव्हाण (पाचवा) ८३.८० टक्के यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे जनरल सेक्रेटर डाॅ.प्रशांत हिरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, सहसचिव डॉ.व्ही.एस. मोरे, शाळा व्यवस्थापन व विकास समितीच्या अध्यक्षा सुजाता शिंदे, प्राचार्य कुणाल गोराणकर, उपमुख्याध्यापक बापू मोरे व शिक्षकांनी कौतुक केले आहे.