डिसेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरण अशक्य; किमान दोन वर्षांहून अधिक कालावधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:38+5:302021-05-31T04:11:38+5:30

नाशिक : जिल्ह्याला आठवडाभरात कशाबशा ३० ते ३५ हजार लस मिळत आहे, मात्र, या परिस्थितीत डिसेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाच्या ...

100% vaccination impossible by December; Over a period of at least two years! | डिसेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरण अशक्य; किमान दोन वर्षांहून अधिक कालावधी !

डिसेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरण अशक्य; किमान दोन वर्षांहून अधिक कालावधी !

Next

नाशिक : जिल्ह्याला आठवडाभरात कशाबशा ३० ते ३५ हजार लस मिळत आहे, मात्र, या परिस्थितीत डिसेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाच्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेने नाशिकच्या सामान्य नागरिकांना आनंद झाला आहे. तर वस्तुस्थिती ज्ञात असणाऱ्या आणि लसीची वाट पाहून कंटाळलेल्या नागरिकांकडून ही चेष्टा बरी नव्हे असाच सूर उमटला आहे.

कोरोना घराघरांत शिरण्याची भीती निर्माण झाली तेव्हा लसीकरणासाठी सर्व केंद्रांवर प्रचंड गर्दी झाली. या गर्दीमुळे कोरोनाची लागण होईल याचा विचार न करता नागरिकांनी लस मिळवण्याचा प्रयत्न केला, तरीही अनेकांना लस मिळालीच नाही. सध्या जिल्ह्यात केवळ ३ टक्के नागरिकांच्या दोन्ही लस घेऊन झाल्या आहेत. सुमारे ६ लाखांनी केवळ एकच लस घेतली आहे. म्हणजे ७२ लाख लोकसंख्येपैकी अद्याप ९७ टक्के जनतेला लसीचे दोन डोस मिळाले नाहीत. लसीकरणाची गती अशीच राहिली तर प्रत्येकाला लसीचे दोन डोस मिळायला पाच वर्षेही पुरणार नाहीत. तर लसपुरवठा मुबलक प्रमाणात झाला तरी दोन वर्षांहून अधिक कालावधी लागणार आहे.

पॉईंटर्स

आजपर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस दुसरा डोस एकही डोस न घेतलेले

आरोग्य कर्मचारी

फ्रंटलाइन वर्कर्स

ज्येष्ठ नागरिक

४५ ते ६० वर्षे वयोगट

१८ ते ४४ वर्षे वयोगट

ग्राफ

लसीकरण प्रारंभ १६ जानेवारी

प्रत्येक आठवड्याला २५,०००

प्रत्येक महिन्याला १,००,०००

हीच गती कायम राहिल्यास जून २०२३ पर्यंतही लसीकरण १०० टक्के पूर्ण होणार नाही.

बॉक्स

१८ वर्षांखालील लसीकरण म्हणजे स्वप्नरंजनच!

शेवटच्या टप्प्यात १८ वर्षांखालील लोकसंख्येच्या लसीकरणाचे शासनाचे नियोजन आहे; पण ते अद्याप कागदावरच आहे. या वयोगटात जिल्ह्यात तब्बल २० लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी कोणती लस वापरणार, किती डोस द्यावे लागतील,? किती दिवसांच्या अंतराने द्यावे लागतील, याचे कोणतेही नियोजन शासनाकडून अद्याप आलेले नाही. १८ वर्षांवरील लोकसंख्येच्या लसीकरणाचा ताळमेळ अद्याप नसताना त्याखालील लाभार्थींचे लसीकरण म्हणजे फक्त स्वप्नरंजनच ठरणार आहे.

बॉक्स

लसीकरण केंद्रांच्या संख्येत दररोज बदल

जानेवारीत पाच केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. पुरवठा वाढला तेव्हा केंद्रेही टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. २६७ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. लसींचा तुटवडा होऊ लागला तेव्हा मात्र अनेक केंद्रे बंद पडली. कधीकधी फक्त २० तर कधीकधी ५ केंद्रांवरच लसीकरण सुरू असते. आठवड्यातून एकदा २५ ते ३५ हजार डोस येतात. पाच दिवसांत संपूनही जातात. अशावेळी सर्व केंद्रांवरील लसीकरण थांबण्याचे प्रकारदेखील घडतात.

कोट

किमान दोन लाख लसींचा पुरवठा करावा अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे. मागणी प्रचंड असल्याने दोन-तीन दिवसांतच लस संपते. पुरेसा पुरवठा झाला तर वेगाने लसीकरण करण्याची आमची तयारी आहे. सध्याची गती पाहता संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण कधी पूर्ण होईल याचा अंदाज करता येत नाही. --------------

-------------------

ही डमी आहे.

Web Title: 100% vaccination impossible by December; Over a period of at least two years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.