अंदरसूल येथे महिला सबलीकरण शिबिरात १०० महिलांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:31 AM2018-09-29T01:31:48+5:302018-09-29T01:32:12+5:30

येवला तालुक्यातील अंदरसूल येथे येवला-लासलगाव शिवसेना व नारायण गिरी महाराज फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी दोनदिवसीय महिला सबलीकरण शिबिर संपन्न झाले. यात सुमारे शंभर महिलांनी सहभाग घेतला.

 100 women participate in the Women Empowerment Camp at Insurgulas | अंदरसूल येथे महिला सबलीकरण शिबिरात १०० महिलांचा सहभाग

अंदरसूल येथे महिला सबलीकरण शिबिरात १०० महिलांचा सहभाग

Next

अंदरसूल : येवला तालुक्यातील अंदरसूल येथे येवला-लासलगाव शिवसेना व नारायण गिरी महाराज फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी दोनदिवसीय महिला सबलीकरण शिबिर संपन्न झाले. यात सुमारे शंभर महिलांनी सहभाग घेतला.
ज्या महिलांचा शिवण क्लास पूर्ण झाला आहे; परंतु त्यांना मास्टर कटिंग येत नाही अशा महिलांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान एमएफडी मॅजिक कटिंग स्केल मार्फत फॅशन डिझाईन शिवणकामातील कटिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक शंकर बोरणारे, मोनाली बोरणारे, शिवनाथ बोरणारे यांनी उपस्थित महिलांना प्रशिक्षण दिले.  यावेळी नारायण गिरी फाउण्डेशनचे अध्यक्ष विष्णू भागवत, येवला-लासलगाव विधानसभा शिवसेना संघटक तथा रूपचंद भागवत, दिंडोरी लोकसभा शिवसेना संघटक सर्जेराव सावंत, शिवसेनेचे युवा नेते दीपक जगताप, विलास भागवत, ज्ञानेश्वर भगवात, एकनाथ भालेराव, दिलीप बागल , यशवंत आदमाणे , दत्ता जेजुरकर आदींसह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या. दरम्यान हा उपक्र म येवला -लासलगाव विधानसभा अंतर्गत सर्व महिलांसाठी राबवणार आहे. सर्व इच्छुक महिलांनी या उपक्र मात भाग घेऊन आपले कौशल्य वाढवावे, असे आवाहन रूपचंद भागवत यांनी केले आहे.

Web Title:  100 women participate in the Women Empowerment Camp at Insurgulas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.